Join us

आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मिळणार मदत, दुष्काळी सवलतीही लागू; वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 08:58 IST

अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे.

अस्मानी संकटामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. पूरग्रस्त भागात नुकसानीसाठी तातडीची १० हजाराची मदत देण्यात आली आहे. अशा संकट काळात अन्नदाता बळीराजाच्या मदतीसाठी शासन धावून आले आहे.

खरडून गेलेल्या जमिनींना प्रति हेक्टरी ४७ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. तसेच मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना) मधून तीन लाख रूपये प्रति हेक्टरी देण्यात येतील.

रब्बीच्या हंगामासाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १० हजाराची मदत मिळणार आहे. केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर केंद्रही शेतकऱ्यांना मदत करणार आहे. 

निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत◼️ शेतकऱ्यांना मदत देताना अ‍ॅग्रीस्टॅकमधील माहिती ग्राहा थरली जाणार आहे. मदतीसाठी शेतकऱ्यांना कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. जे शेतकरी मदतीच्या निकषात बसणार नाहीत, त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत दिली जाणार आहे.◼️ साखर कारखान्यांच्या नफ्यातून प्रति टन ५ रुपये कापण्याच्या निर्णयावर टीका होत असून, त्याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, या पाच रुपयांचा विचार केला तर फक्त ५० कोटी रुपये मिळतात. कारखान्यांकडून हे पैसे घेतले जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या एफआरपीमधून पैसे कापले जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.◼️ पूरग्रस्तांसाठी अचानक तरतूद करावी लागल्यामुळे विकासकामांवर ताण येईल. काही ठिकाणी काही बाबींवर खर्च कमी करावा लागेल, असेही ते म्हणाले.

दुधाळ जनावरांच्या मर्यादाची अट काढली◼️ दुधाळ जनावरे दगावली असल्यास तीन जनावरांपर्यंतच मदत मिळत होती, आता ही मर्यादेची अट काढून टाकली आहे.◼️ रब्बी पिकांच्या नुकासानीसाठी प्रति हेक्टर १० हजार रुपये दिले जाणार आहेत.◼️ विहिरींच्या नुकसानीसाठी आतापर्यंत मदत मिळत नव्हती, यावेळी ती प्रति विहीर ३० हजार रुपये दिली जाणार आहे.◼️ तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीत राखीव ठेवण्यात आले आहेत.

तीन हेक्टरपर्यंत मदतएनडीआरएफच्या निकषानुसार कोरडवाहू जमिनीसाठी पूर्वी ८,५०० रुपये मदत मिळत होती, ती आता १८ हजार ५०० करण्यात आली आहे. हंगामी बागायतीसाठी १७ हजार ऐवजी २७ हजार, तर बागायतीसाठी २२ हजार ५०० ऐवजी ३२ हजार ५०० रुपये मदत दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली जाणार आहे.

असे आहे पॅकेजमृतांच्या कुटुंबीयांना : ४ लाख प्रत्येकी.जखमी व्यक्तींना : ७४ हजार रुपये ते २.५ लाख रुपये.घरगुती भांडे, वस्तूंचे नुकसान : पाच हजार रुपये प्रति कुटुंब.कपडे, वस्तूंचे नुकसान : पाच हजार रुपये प्रतिकुटुंब.दुकानदार, टपरीधारक: ५० हजार रुपये.डोंगरी भागात पडझड, नष्ट पक्क्या घरांना : एक लाख २० हजार रुपये.डोंगरी भागात पडझड, नष्ट कच्च्या घरांना : ए‍‍क लाख ३० हजार रुपये.अंशतः पडझड : ६,५०० रुपये.झोपड्या : आठ हजार रुपये.जनावरांचे गोठे : तीन हजार रुपये.दुधाळ जनावरे : ३७,५०० रुपये.ओढकाम करणारी जनावरे : ३२ हजार रुपये.कुक्कुटपालन : १०० रुपये प्रति कोंबडी

खरडून गेलेल्या जमिनीसाठीनिकषापेक्षा अधिकची मदत देण्यासाठी १० हजार कोटी रुपये अतिरिक्त, खरडून गेलेल्या जमिनीसाठी ४७ हजार रुपये प्रति हेक्टर थेट मदत आणि मनरेगाअंतर्गत तीन लाख रुपये प्रतिहेक्टर, खचलेली किंवा बाधित विहीर: ३० हजार रुपये प्रति विहीर, तातडीच्या मदतीसाठी १५०० कोटी रुपये जिल्हा नियोजन निधीमध्ये राखीव.

दुष्काळी सवलती लागूजमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा, महाविद्यालय परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामात शिथिलता, शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.

अधिक वाचा: कॅन्सरशी लढणारे घटक असणारं 'हे' पौष्टिक कंदमूळ तुम्हाला माहित आहे का? वाचा सविस्तर

टॅग्स :शेतीशेतकरीपूरपीकराज्य सरकारसरकारपोल्ट्रीदुग्धव्यवसायदुष्काळरब्बीऊस