Join us

आता सीताफळ खाल्ल्यावर बी फेकून देऊ नका बरं! 'हे' आहेत सीताफळ बियांचे आरोग्यदायी फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:01 IST

Health Benefits Of Custard Apple Seed : सीताफळ हे आपल्या स्वादाने आणि पोषणतत्त्वांनी प्रसिद्ध असलेले फळ आहे. तसेच त्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

सीताफळ हे आपल्या स्वादाने आणि पोषणतत्त्वांनी प्रसिद्ध असलेले फळ आहे. तसेच त्याच्या बियांमधील औषधी गुणधर्म देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

सीताफळाच्या बियांमध्ये अनेक पोषक तत्त्वे आणि औषधी गुणधर्म असतात. जे आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी मदत करतात.

सीताफळाच्या बियांमध्ये काय आहे?

सीताफळाच्या बियांमध्ये जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व बी, कॅल्शियम, लोह, आणि थायमीन यांसारखी महत्त्वाची पोषणतत्त्वे आढळतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. 

सीताफळाच्या बियांचे फायदे

रक्तवर्धक गुण : सीताफळाच्या बियांमध्ये जीवनसत्त्व बी असते, जे रक्ताच्या कमतरतेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

वजन नियंत्रण : वजनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीताफळाच्या बियांचे सेवन फायदेशीर ठरते. यासाठी बिया तव्यावर भाजून खाल्ल्या जाऊ शकतात.

रक्तातील साखर नियंत्रण : बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम शरीराच्या हायड्रेशनसाठी मदत करतात आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतात.

डोळ्यांचे आरोग्य : जीवनसत्त्व ए ने भरपूर असलेल्या या बियांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. त्यांचे चूर्ण खाल्ल्याने डोळ्यांना लाभ होतो.

आरोग्यदायी केस : सीताफळाच्या बियांचे चूर्ण केसांना नैसर्गिक चमक देण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी वापरले जाऊ शकते.

हेही वाचा : गुणकारी बेल फळाचे आरोग्यदायी फायदे वाचून तुम्ही देखील व्हाल थक्क

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सफळेशेती क्षेत्रशेतकरी