lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला

MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला

MPSC Exam Rajyaseva Joint Preliminary Exam will be held on July 6 | MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला

MPSC Exam राज्यसेवा संयुक्त पूर्वपरीक्षा होणार येत्या सहा जुलैला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ सुधारित तारीख जाहीर केली असून दि. ६ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अराखीव खुल्या गटातून अर्ज केलेल्या तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल उमेदवारांना विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहेत.

युपीएससीप्रमाणे एमपीएससीनेही नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर करावी यासाठी उमेदवारांनी केलेल्या मागणीसंदर्भात 'लोकमत'ने बातमी प्रसिद्ध केली होती.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२४ करिता दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आणि दि. २८ एप्रिल २०२४ रोजी परीक्षेचे आयोजन केले होते.

दरम्यान, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दि. २६ फेब्रुवारी रोजी राज्याच्या नियंत्रणाखालील पदांवरील नियुक्तीकरिता आरक्षणाची तरतूद करण्यात आली.

आयोगाने आरक्षण निश्चिती करून सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत राज्य शासनास कळविले. तसेच दि. २१ मार्च रोजी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

रिक्त पदांच्या संख्येत वाढ
राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या सुधारित मागणीपत्रानुसार रिक्त पदांत वाढ केली आहे. विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांसाठी सुधारित तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

येत्या २४ मेपर्यंत अर्ज करता येणार
अर्जाद्वारे अराखीव खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा दावा केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसईबीसी आरक्षणातून लाभ घेण्यासाठी दि. ९ ते २४ मे या कालावधीत विकल्प सादर करणे तसेच नव्याने अर्ज सादर करता येणार आहे.

अधिक वाचा: Ration Card कागदी रेशनकार्ड होणार आता इतिहासजमा; मिळणार आता ई-शिधापत्रिका

Web Title: MPSC Exam Rajyaseva Joint Preliminary Exam will be held on July 6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.