राज्यपालांच्या मान्यतेने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्याकडे राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
डॉ. शरद गडाख कुलगुरू होण्यापूर्वी महात्मा फुले कृषि विद्यापीठात संशोधन व विस्तार शिक्षण संचालकपदी कार्यरत होते.
डॉ. शरद गडाख हे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात १९ सप्टेंबर, २०२२ पासून कुलगुरू या पदावर कार्यरत आहेत.
विद्यापीठाची पडीक जमीन लागवडीखाली आणणे, विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठाचे विक्री केंद्र सुरू करणे हे उपक्रम राबविले.
तसेच फळबागेखालील लागवड क्षेत्र वाढविणे, विविध फळांचे प्रात्यक्षिक प्रकल्प, सेंद्रिय शेती प्रकल्प नावीन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले.
राहुरी येथील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विविध पिकांचे १९ वाण विकसित केले आहेत. त्यांचे आत्तापर्यंत ६८ संशोधन लेख, २६ तांत्रिक लेख, १२८ विस्तार लेख आणि विविध प्रकाशने प्रसिद्ध झालेली आहेत.
अधिक वाचा: जुन्या शेतकरी उत्पादक संस्था (FPO) तसेच FPO स्थापन करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी