Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Pune : कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ; 14.5 कोटी रूपयांचे अनुदान वाटप

Pune : कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ; 14.5 कोटी रूपयांचे अनुदान वाटप

More than two thousand women benefited under the Agricultural Mechanization Scheme; Grant of Rs. 14.5 crore distributed | Pune : कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ; 14.5 कोटी रूपयांचे अनुदान वाटप

Pune : कृषी यांत्रिकीरण योजनेअंतर्गत दोन हजाराहून अधिक महिलांना लाभ; 14.5 कोटी रूपयांचे अनुदान वाटप

सन २०२०-२१ पासुन महाडीबीटी संकेतस्थळावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

सन २०२०-२१ पासुन महाडीबीटी संकेतस्थळावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते.

Pune :  कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये एकूण १२ हजार ७१९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून त्यापैकी २ हजार १८ महिला लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यांना १४ कोटी ४७ लाख ८८ हजार रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. 

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजने अंतर्गत ३ हजार २७० लाभार्थ्यां पैकी ३२७, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये ६ हजार ९६ लाभार्थ्यांपैकी १ हजार २१५ आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ३ हजार ३५३ लाभार्थ्यांपैकी ४७६ महिला लाभार्थी असे एकूण महिला लाभार्थी आहेत.  

 केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान (६०:४० केंद्रः राज्य) तसेच राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना, शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे, विभागनिहाय पीकरचनेनुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषी औजारे अनुदानावर उपलब्ध करुन देणे, कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहेत.

सन २०२०-२१ पासुन महाडीबीटी संकेतस्थळावर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनुदानाची रक्कम रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते. (महिला, अनु.जाती, अनु.जमाती, अल्प व अत्यल्प भुधारक यांना ५० टक्के तर इतर लाभार्थ्यांना ४० टक्के अनुदान तसेच किसान ड्रोन खरेदीसाठी कृषी पदवीधर शेतकऱ्यांसाठी अनुदान दर ५० टक्के किंवा रु. ५ लाख व इतर शेतकऱ्यांकरिता अनुदान दर ४०  टक्के किंवा ४ लाख यातील कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते अशी माहिती कोचोळे यांनी दिली आहे. 
 

Web Title : पुणे: कृषि यंत्रीकरण योजना से 2000 से अधिक महिलाओं को लाभ

Web Summary : पुणे में कृषि यंत्रीकरण योजना के तहत 2000 से अधिक महिलाओं को 14.5 करोड़ रुपये की सब्सिडी मिली। यह योजना आधुनिक मशीनरी के उपयोग को बढ़ावा देती है, महिलाओं, एससी/एसटी और छोटे भूमिधारकों के लिए 50% तक सब्सिडी प्रदान करती है।

Web Title : Pune: Over 2000 Women Benefit from Agricultural Mechanization Scheme

Web Summary : Over 2000 women in Pune benefited from the agricultural mechanization scheme, receiving ₹14.5 crore in subsidies. The scheme promotes modern machinery use, offering subsidies up to 50% for women, SC/ST, and small landholders, and for drone purchases.