Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

More than half of the seats in agricultural universities in the state are vacant; How many posts are vacant in which university? | राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

राज्यातील कृषी विद्यापीठांत निम्म्याहून अधिक जागा रिक्त; कोणत्या विद्यापीठात किती पदे रिक्त?

विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ५७.४८ टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन, प्रशासकीय कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रभारींच्या खांद्यावर गाडा हाकला जात आहे. कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने आकृतिबंधाची शिफारस केली नसल्याने भरती प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.

विदर्भातील कृषी क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ६३ टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये अत्यंत कळीच्या पदांचा समावेश असल्याने दैनंदिन कामकाजात अडचणी येतात.

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात ४०.९८ टक्के जागा रिक्त आहेत. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ६६.१६ टक्के जागा रिक्त आहेत. अ, क आणि ड वर्गातील जागा रिक्त आहेत.

अशी आहे रिक्त पदांची स्थिती

विद्यापीठमंजूर पदेभरलेली पदेरिक्त पदे
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, परभणी२,९७२१,०८२१,८९०
महात्मा फुले विद्यापीठ, राहुरी४,५३३२,०३५२,४९८
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला३,४४७२,१७३१,२७४
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली१,७५९१,०३८७२१

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांची नुकतीच नियुक्त्ती प्रक्रिया पूर्ण झाली. आकृतिबंध तयार झाल्यानंतर मंत्रालयात मान्यतेसाठी येईल. विधि व न्याय विभाग आणि वित्त विभागाची मान्यता मिळाल्यानंतर मंजूर होणार आहे. - विकासचंद्र रस्तोगी, प्रधान सचिव, कृषी विभाग

अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

Web Title: More than half of the seats in agricultural universities in the state are vacant; How many posts are vacant in which university?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.