हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात नाफेड व एनससीएफच्या वतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची आधारभूत दराने खरेदी करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पीक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन बीड जिल्हा पणन अधिकारी हरिदास भोसले यांनी केले आहे.
शासनाच्या यंत्रणेमार्फत पीक कापणी अहवाल आल्यानंतर मर्यादा ठरविली जाणार असून ऐनवेळी अडचण होऊ नये म्हणून संबंधित उत्पादक शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आहे.
शासकीय योजनेंतर्गत खरेदी केले जाणारे धान्य तसेच कापूस यासाठी ई-पीक पाहणी अहवाल आवश्यक असतो. परंतु अनेक शेतकरी या प्रक्रियेपासून दुर्लक्ष करतात.
काय होणार खरेदी ?
मूग, उडीद, सोयाबीन व तूर
विक्री करण्यासाठी काय आवश्यक ?
ई-पीक पाहणी असलेला ७/१२ उतारा आवश्यक आहे.
खरेदी प्रक्रिया ऑनलाइन
ही खरेदी प्रक्रिया ही शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपूर्णपणे ऑनलाइन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेला हमीभाव (एमएसपी)
तूर - ८०००
मूग - ८७६८
उडीद - ७८००
हेही वाचा : करटुले शेती का आहे शेतकऱ्यांसाठी नफा देणारी? जाणून घ्या संधी आणि फायदे