lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > जलसंपदा विभागात ४,४९७ पदे; कुठे कराल अर्ज?

जलसंपदा विभागात ४,४९७ पदे; कुठे कराल अर्ज?

Mega Recruitment of 4,497 Posts in Water Resources Department, how to apply? | जलसंपदा विभागात ४,४९७ पदे; कुठे कराल अर्ज?

जलसंपदा विभागात ४,४९७ पदे; कुठे कराल अर्ज?

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात सर्वेक्षण, संशोधन, नियोजन, संकल्पन बांधकाम आणि जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन हे काम चालते. पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. शहरी भागातही विभागाचे काम चालते. विभागातील ४ ४९७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात सर्वेक्षण, संशोधन, नियोजन, संकल्पन बांधकाम आणि जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन हे काम चालते. पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. शहरी भागातही विभागाचे काम चालते. विभागातील ४ ४९७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागात सर्वेक्षण, संशोधन, नियोजन, संकल्पन बांधकाम आणि जलसंपदा प्रकल्पांचे व्यवस्थापन हे काम चालते. पाणीपुरवठा व कृषी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. शहरी भागातही विभागाचे काम चालते. विभागातील ४,४९७ रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे मोठी संधी आहे. या पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल.

रिक्त पदे पुढीलप्रमाणे

पदेपदसंख्या
वरिष्ठ वैज्ञानिक सहायक गट-ब
निम्नश्रेणी लघुलेखक१९
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक१४
भूवैज्ञानिक सहायक
आरेखक२५
सहायक आरेखक६०
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक१,५२८
प्रयोगशाळा सहायक३५
अनुरेखक२८५
दप्तर कारकून४३०
मोजणीदार७५८
कालवा निरीक्षक१,१८९
सहायक भांडारपाल१३८
कनिष्ठ सर्वेक्षण सहायक 

शैक्षणिक पात्रता
-
वरिष्ठ वैज्ञानिक सहायक गट - भौतिक शास्त्र/रसायनशास्त्र/भुगर्भ शास्त्र या विषयामधील किंवा कृषी (मृद शास्त्र/कृषी रसायन शास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी (किमान ६०% गुणांसह)
- कनिष्ठ वैज्ञानिक सहायक गट क - भौतिक शास्त्र/रसायनशास्त्र/भुगर्भ शास्त्र या विषयामधील पदव्युत्तर पदवी
- भूवैज्ञानिक सहायक गट क - भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर
आरेखक गट क स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत अभियांत्रिकीमधील पदवी, पदविका असल्यास शासकीय/निमशासकीय कार्यालयामध्ये सहायक आरेखक पदाचा प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षांचा अनुभव.
- सहायक आरेखक गट क - स्थापत्य यांत्रिकी/विद्युत

अर्ज शुल्क
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी - १०००
रुपये, मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ/दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारासाठी - ९०० रुपये

ऑनलाईन नोंदणीसाठी लिंक: https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

कोणती पदवी हवी?
-
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट क - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका.
- प्रयोगशाळा सहायक गट क - भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/भूगर्भ शास्त्र या विषयामधील पदवी किंवा कृषी पदवी.
अनुरेखक गट क आरेखक स्थापत्य, कला शिक्षक पदविका दफ्तर कारकून गट क कोणत्याही शाखेची पदवी व टंकलेखन प्रमाणपत्र.
- मोजणीदार गट क - कोणत्याही शाखेची पदवी व टंकलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा.

प्रा. राजेंद्र चिंचोले (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक)

Web Title: Mega Recruitment of 4,497 Posts in Water Resources Department, how to apply?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.