Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

Maximum area under soybean crop in Maharashtra in this kharif | यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र; कपाशी लागवड दुसऱ्या क्रमांकावर

यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.

यंदाच्या खरिपात राज्यात ९९ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी १०६६ मंडळांमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होऊ शकतो.

१ जून ते दि.११ सप्टेंबर या कालावधीचे राज्याचे सरासरी पर्जन्यमान ८९०.४ मिमी असून या खरीप हंगामात दि.११ स्पटेंबरपर्यंत प्रत्यक्षात ७६६ मिमी (दि.११ सप्टेंबर पर्यंतच्या सरासरीच्या ८६%) एवढा पाऊस पडलेला आहे. 

खरीप हंगामातील राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर असून ११ सप्टेंबर २३ अखेर प्रत्यक्षात १४१.०९ लाख हेक्टर (९९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. राज्यात पेरणीची कामे पुर्ण झालेली आहेत. ११ सप्टेंबरपर्यंत राज्यात सोयाबीन पिकाची ५०.७२ लाख हे. क्षेत्रावर, कापूस पिकाची ४२.३० लाख हे. क्षेत्रावर, तूर पिकाची ११.१५ लाख हे. मका पिकाची ९.११ लाख हे. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच भात पिकाची १५.२८ लाख हे. क्षेत्रावर पुर्नलागवड झाली आहे.

राज्यामध्ये दि.२५-७-२३ ते  दिनांक ११ सप्टेंबर २३ अखेर ६१३ महसूल मंडळामध्ये १५ ते २१ दिवसांचा तर ४५३ महसूल मंडळामध्ये २१ दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.

खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१लाख क्विं.बियाणे गरजेच्या तुलनेत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं.बियाणे उपलब्ध होते.  त्यानुसार राज्यात १९,७२,१८२ क्विंटल (१०२%) बियाणे पुरवठा झालेला आहे.

खरीप हंगाम २३ करिता राज्यास ४३.१३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून  आतापर्यंत ५९.४७लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध  झाला आहे. त्यापैकी ३९.४१ लाख मे.टन खतांची विक्री झालेली असून सद्यस्थितीत राज्यात २०.०६ लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
 

Web Title: Maximum area under soybean crop in Maharashtra in this kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.