Lokmat Agro >शेतशिवार > Market Yard : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती

Market Yard : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती

Market Yard: Agricultural Produce Market Committee rules will be amended; Information from the Marketing Minister | Market Yard : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती

Market Yard : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार; पणनमंत्र्यांची माहिती

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. 

शेअर :

Join us
Join usNext

Pune : कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासापोटी शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करीत असतो. शेतकरी हिताच्या दृष्टीने काळानुरूप बाजार समितीच्या नियमांमध्ये किंवा धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत दिली. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे न दिल्याबाबत सदस्य रमेश बोरनारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या उत्तरात मंत्री रावल म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना दिलेले व्यापारी हे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करतात. शेतकरी मोठ्या विश्वासाने या व्यापाऱ्यांना आपला शेती माल विक्री करतात. अशा व्यापारामध्ये कुठेही शेतकऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाचा मोबदला कायद्यानुसार त्याच दिवशी किंवा किमान पुढील सात दिवसाच्या आत देणे गरजेचे आहे. 

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा मोबदला देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याची मालमत्ता व बँक हमी जप्त केली आहे. या बँक हमी आणि मालमत्तेच्या लिलावातून ३१ लाख रुपये हे कांदा विक्री केलेल्या ११८ शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. 

कलम ५७ अन्वये व्यापाराच्या वैयक्तिक मालमत्तांची यादी करून जमीन महसूल थकबाकी कायद्यानुसार या सर्व मालमत्तांची एकत्रित लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेला गती देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे देण्यात येतील. या संपूर्ण प्रकरणात बैठकही घेण्यात येईल, असेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.

Web Title: Market Yard: Agricultural Produce Market Committee rules will be amended; Information from the Marketing Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.