Join us

Market Update : हमीभावाची दिसेना 'हमी' बाजारात मका उत्पादकांची होतेय नाराजी

By रविंद्र जाधव | Updated: November 6, 2024 21:38 IST

हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या (MSP Price) तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची (Farmers) मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मका (Maize) बाजारात (Market) मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे. 

हमीभाव न मिळाला तर किमान हमीभावाच्या तुलनेत काहीतरी दर मिळावा या अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची मात्र बाजारत हिरमोड होत आहे. २२२५ रुपयांचा हमी भाव असेलली मकाबाजारात मात्र १५००-२००० रुपयांत खरेदी केली जात आहे. 

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्याच्या शिऊर बाजार समितीच्या आवारात आज बुधवार (दि.०६) मका लिलावामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे कुठेही आद्रता मशीन दिसून आले नाही. तर या सोबतच अगदीच १४००-१५०० रुपये पासून तर केवळ २००० रुपयांपर्यंतचा दर मकाला मिळाला. 

यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर लिलावादरम्यान अनेकांनी व्यापाऱ्यांना खडे बोल सुनावले मात्र 'आम्ही याच दराने खरेदी करतो, द्यायची असेल तर द्या' अशा उद्धटपणाचे उत्तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला दिले. ज्यामुळे नाईलाजस्तव शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकावा लागला. मात्र असं असूनही लिलाव पश्चात हा शेतमाल व्यापाऱ्यांच्या गोदामा पर्यंत पोहोचविण्यासाठी देखील शेतकऱ्यांना ५-५ किलोमीटरचा फेरा करावा लागतो आहे.

ज्यामुळे आधीच बाजारात लूट होत असताना पुन्हा वाहतुकीचा खर्च शेतकऱ्याला करावा लागत आहे.  यासंदर्भात 'लोकमत अॅग्रो डॉट कॉम'ने शिऊर बाजार समितीच्या सचिवांशी चर्चा केली तेव्हा मात्र अपेक्षित काहीच उत्तर त्यांच्याकडून मिळाले नाही हेही विशेष.

शिऊर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भारम बाजार समितीत २००० च्या पुढे दर आहे. मग या बाजार समितीत का दर कमी आहे याबाबत मोठी शंका आहे. तसेच अनेकदा व्यापारी खरेदी केलेल्या मालाची रक्कम रोख देत नाही. मात्र बाजार समिती कांगावा करते की, व्यापारी रोख स्वरूपातच पैसे देतात. - भगवान गायकवाड, शेतकरी शिऊर.  

हेही वाचा :  Honey Health Benefits : मधाळ मधाचे आरोग्यदायी फायदे

टॅग्स :बाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीछत्रपती संभाजीनगरमराठवाडामका