Lokmat Agro >शेतशिवार > MahaDBT Portal: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; जाणून घ्या काय आहे कारण

MahaDBT Portal: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; जाणून घ्या काय आहे कारण

MAHADBT Portal: latest news Application process on MahaDBT Portal temporarily closed, know the reason | MahaDBT Portal: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; जाणून घ्या काय आहे कारण

MahaDBT Portal: महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद; जाणून घ्या काय आहे कारण

MahaDBT Portal: कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु तात्पुरत्यास्वरुपात पोर्टल बंद करण्यात आले आहे. जाणून घ्या काय आहे कारण.

MahaDBT Portal: कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु तात्पुरत्यास्वरुपात पोर्टल बंद करण्यात आले आहे. जाणून घ्या काय आहे कारण.

शेअर :

Join us
Join usNext

MahaDBT Portal : कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) अर्ज करणे अनिवार्य आहे. सध्या पोर्टलमध्ये काही सुधारणा सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तथापि, १५ एप्रिलनंतर पोर्टल पूर्ववत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.

कृषी विभाग शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा शुभारंभ करतो, आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) नोंदणी करणे आवश्यक आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर शेतकऱ्यांना या योजनांसाठी अर्ज सादर करण्याची सुविधा मिळते.

नव्या आर्थिक वर्षात पोर्टलमध्ये सुधारणा

* २०२४-२५ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२५ रोजी संपले. १ एप्रिलपासून २०२५-२६ या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे.

* नव्या आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टलमध्ये काही तांत्रिक सुधारणा करण्यात येत आहेत, त्यामुळे अर्ज प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली गेली आहे.

* यासंबंधी शेतकऱ्यांसाठी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात आलेल्या असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

पोर्टलवर उपलब्ध कृषी विभागाच्या योजना

महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी कृषी सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

जे १५ एप्रिलनंतर पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.  शेतकरी नवीन नोंदणीसह विविध योजनांसाठी अर्ज करू शकतील. त्यानंतर शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळू शकेल.

हे ही वाचा सविस्तर : Panand road : मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून शेतकऱ्यांची समृद्धी; 'हे' मिळणार विनामूल्य वाचा सविस्तर

Web Title: MAHADBT Portal: latest news Application process on MahaDBT Portal temporarily closed, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.