Solar Pump Scheme : केंद्र सरकारच्या माध्यमातून मागेल त्याला सोलर पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ३ एचपी,५ एचपी आणि ७ एचपी कृषी सोलर पंपांचा लाभ देण्यात येतो. जवळपास ९० टक्के अनुदान शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांना नेमके किती पैसे भरावे लागतात, ते पाहुयात...
सोलर पंप योजनेत (मागेल त्याला सौर कृषी पंप योजना) शेतकऱ्यांना फक्त १० टक्के रक्कम भरावी लागते. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना (SC/ST) ५ टक्के रक्कम भरावी लागते. याची अर्जप्रक्रिया सध्या सुरु आहे.
तर उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकार अनुदानाद्वारे देते. ही १० टक्के रक्कम पंपचा प्रकार आणि क्षमतेनुसार बदलते, पण ही रक्कम भरल्यानंतरच पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू होते.
सर्वसाधारण शेतकऱ्यांना भरावी लागणारी रक्कम
- ३ HP क्षमतेचा पंप – १७ हजार ५०० ते १८ हजार रुपये
- ५ HP क्षमतेचा पंप – २२ हजार ५०० रुपये
- ७ HP क्षमतेचा पंप – २७ हजार रुपये
अशा प्रकारे सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना रक्कम भरावी लागते. तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना यापेक्षा कमी रक्कम भरावी लागते. अधिक माहितीसाठी जवळच्या महावितरण कार्यालयातला भेट द्या.
Read More : कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू, सध्या दर कसे आहेत, संक्रातीनंतर दर कसे राहतील?
