Solar Pump Yojana : "मागेल त्याला सौर कृषी पंप" या योजनेच्या घटक "अ" अंतर्गत महावितरण कंपनीने सर्व वर्गवारीतील लाभार्थ्यांसाठी आस्थापित केलेल्या सौर कृषी पंपाकरीता राज्य शासन हिश्यापोटी ३८८ कोटी ५१ लाख ३९ हजार इतका निधी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या., मुंबई यांना वितरीत करण्यास याद्वारे शासन मंजूरी देण्यात आली आहे.
AIIB बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारेषण विरहित सौर कृषीपंप देण्याच्या (मागेल त्याला सौर कृषी पंप) योजनेसाठी राज्य शासन हिस्स्यापोटी ३८८ कोटी ५१ लाख ३९ हजार कोटी इतका निधी महावितरण कंपनीस वितरीत करणे बाबत शासन निर्णय काढण्यात आला आहे. सदर निधी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या., मुंबई यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप" या योजनेच्या घटक-"अ" योजनेवरील अहवाल लगतच्या महिन्याच्या १० तारखेपर्यंत महावितरण कंपनीने शासनास सादर करावा. या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला निधी केवळ या योजनेसाठीच सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येईल, याची खातरजमा करण्यात यावी.
मान्य व अनुज्ञेय काळात खर्च करण्याची जबाबदारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण यांची राहील. याबाबतचा त्रैमासिक अहवाल सादर करण्याची जबाबदारी संचालक (अर्थ) यांची राहील. सदर निधीच्या लेख्यासंबंधीची कागदपत्रे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या., यांनी आवश्यक तेव्हा महालेखापाल, मुंबई, महाराष्ट्र-१ यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत.
खरीप २०२४, रब्बी हंगाम २०२४-२५ पिक विमा मंजुरीचा शासन निर्णय आला, 'या' तारखेपासून पैसे वाटप
