Honey Bee Life : तुम्ही कधी मधमाशीचं पोळ बघितलं आहे का? मला माहितीये अनेक जणांनी कधी ना कधी मधमाशीचं पोळं बघितलं असणार आहे. समजा आतापर्यंत कुणी बघितले नसेल, तर कुठेतरी शहराबाहेर गेल्यावर किंवा आजूबाजूच्या झाडांवर बधा मधमाशीचं पोळं आहे का? कधी-कधी कुणाच्या घरी पण मधमाशीचं पोळं असतं बर का.
कुणाला कधी मधमाशी चावली आहे का?, बापरे! खूप त्रास होतो बरे. मधमाशी चावते त्याला इंख म्हणतात. हा शब्द माहितीये का तुम्हाला? आणि मध कुणाकुणाला आवडतो?, मधाचे औषधी उपयोग पण बरेच असतात. तर, तुम्हाला मधमाशी, मधमाशीचं पोळे, मध, माशीचा डंख हे सगळं माहिती असणारे किंवा कधीतरी कानावर पडलेलं असणारे.
मधमाशी अखंड राबून गोड-गोड मध तयार करते... या पोळ्यातलं जग नेमकं कसं असतं? पाहुयात
षटकोनी कप्पे (Hexagonal Cells) : मधमाश्या मेणापासून सहा कोनी कप्पे बनवतात, ज्याला 'मधपोळे' (Honeycomb) म्हणतात. हे आकार अवकाशाचा सर्वाधिक कार्यक्षम वापर करतात.
मध (Honey) : पोळ्याच्या वरच्या भागात कामकरी मधमाश्या फुलांमधील अमृत (Nectar) साठवतात आणि त्यापासून मध तयार करतात.
परागकण : मधमाश्यांच्या पिल्लांसाठी आणि अन्नासाठी परागकण साठवले जातात, जे पिवळ्या, नारंगी किंवा लाल रंगाचे असू शकतात.
मधमाशीची भाकरी : परागकण आणि मध यांचे मिश्रण, जे मधमाश्यांचे मुख्य अन्न आहे.
राणीमाशीची अंडी आणि पिल्ले : पोळ्याच्या मधल्या किंवा खालच्या भागात राणीमाशी अंडी घालते, ज्यातून अळ्या (Larvae) आणि नंतर मधमाश्या तयार होतात.
राणीमाशी, कामकरी माश्या आणि नर माश्या : पोळ्यात १ राणीमाशी, हजारो कामकरी माश्या (स्त्रिया) आणि काही नर माश्या (Drones) राहतात.
थोडक्यात, मधाचे पोळे हे मधमाश्यांचे घर, अन्नाचा साठा आणि पिल्लांची संगोपन केंद्र असते.
