Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी

Agriculture News : मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी

Latest News Want to take free beekeeping training in nashik kvk, registration is open here | Agriculture News : मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी

Agriculture News : मोफत मधमाशी पालन प्रशिक्षण घ्यायचंय, इथं सुरु आहे नावनोंदणी

Agriculture News : प्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Agriculture News : प्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात (Nashik Krushi Vidnyan Kendra) सात दिवसीय निवासी मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण (Honey Bee Farming) कार्यक्रम दि. १९ ते २५ मे, २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरासाठी इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय मधुमक्षिका पालन (Madhmashi Palan) व मध अभियान अंतर्गत आयोजित या शिबिरात महाराष्ट्रातील नामांकित तज्ञांचे विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यात मधुमक्षिकांचे विविध प्रकार आणि वैशिष्ट्ये, पालन कौशल्ये, संगोपन व संवर्धन,. परागीभवन व कृषी उत्पादन वाढीसाठीची भूमिका, मध संकलन व प्रक्रिया, मार्केटिंग व व्यवसाय संधी आदींचा समावेश असणार आहे. 

प्रात्यक्षिकात मधुमक्षिकांच्या वसाहतींची मांडणी, वसाहतींचे विभाजन, पेट्यांची रचना व पोळे बांधणी, रोग नियंत्रणासाठी वसाहतीची साफसफाई, जलद परागीभवनासाठी शेतात व बागेत मधुमक्षिकांच्या वसाहतींची मांडणी करणे. मध काढणी व प्रक्रिया इत्यादी बाबींचा समावेश असेल. तसेच य्रा प्रशिक्षणात सहलीचे देखील आयोजन होईल. 

इच्छुक शेतकरी व युवक-युवतींनी या प्रशिक्षणाच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी  ऋषिकेश पवार यांच्याशी ७३८५२७२४०९ या भ्रमणध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. नितीन ठोके यांनी केले आहे.

Web Title: Latest News Want to take free beekeeping training in nashik kvk, registration is open here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.