Vermicompost : कारंजा तालुक्यातील गायवळ या छोट्याशा गावाने नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात राज्यभर गाजावाजा केला आहे. येथे कार्यरत असलेल्या गायवळ जैवसंसाधन केंद्राने सेंद्रिय घटक निर्मिती आणि नैसर्गिक शेतीचे उत्तम मॉडेल तयार केले आहे. (Vermicompost)
या केंद्रातून तयार होणारे गांडूळ खत (Vermicompost) आणि इतर जैवउत्पादने केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी मिळवत आहेत.(Vermicompost)
केंद्राचे प्रमुख रवींद्र गायकवाड यांच्या माहितीनुसार, सध्या केंद्रातून महिन्याला तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची विक्री केली जात आहे. गेल्या काही महिन्यांत केंद्राने २७६ क्विंटल गांडुळ खताची विक्री करून उल्लेखनीय उच्चांक नोंदवला आहे.(Vermicompost)
'मातीचा जीत' ची वाढती लोकप्रियता
गांडूळ खताला 'मातीचा जीत' हा दर्जा मिळाला आहे.
कारण हे संपूर्णपणे रसायनमुक्त
मातीचे आरोग्य सुधारक
पिकांच्या उत्पादनक्षमतेत नैसर्गिक वाढ
पाण्याची धारणक्षमता वाढवणारे
पर्यावरणपूरक
यामुळे शेतकऱ्यांचा कल वेगाने सेंद्रिय खतांकडे वळत आहे.
राज्यभरातून वाढती मागणी
गायवळ येथील जैवसंसाधन केंद्र नैसर्गिक शेतीसाठी लागणारे विविध घटक गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, बियाणांवरील सेंद्रिय प्रक्रिया द्रव्ये, किटकनाशकांचे सेंद्रिय पर्याय यांची निर्मिती करत असून, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र अशा राज्यभरातील जिल्ह्यांतून मोठी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांचा वाढता विश्वास
केंद्राचे उत्पादने वापरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी खालील फायदे नमूद केले आहेत
उत्पादनात १५–२०% वाढ
खर्चात बचत — रासायनिक खतांच्या तुलनेत खर्च निम्म्याने कमी
मातीची सुपीकता वाढ
रोग-कीड प्रतिकारशक्ती वाढ
दीर्घकालीन शाश्वतता
गायवळचे जैवसंसाधन केंद्र हे आज नैसर्गिक शेतीच्या दिशेने बदल घडवणारे प्रेरणास्थान ठरत आहे. लहान गावातून सुरू झालेला हा उपक्रम राज्यभरातील शेतकऱ्यांना रसायनमुक्त, शाश्वत कृषीकडे वळण्यास हक्काची दिशा देत आहे.
शाश्वत शेतीचा आदर्श पॅटर्न
गायवळ गावाने संपूर्ण राज्याला नैसर्गिक शेतीची नवी दिशा दाखवली आहे. हे केंद्र केवळ खत निर्मिती केंद्र नाही, तर परिवर्तनाचे केंद्रस्थान आहे. रासायनिक शेतीतून बाहेर पडून शाश्वत, पर्यावरणपूरक, मातीच्या आरोग्यास पोषक शेतीकडे वळण्यासाठी हे आदर्श मॉडेल ठरले आहे.- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
