Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

latest news VBG RAMJI Scheme: Big twist in employment scheme! New scheme to come from April; Read in detail | VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

VBG RAMJI Scheme : रोजगार योजनेत मोठा ट्विस्ट! एप्रिलपासून नवी योजना येणार; वाचा सविस्तर

VBG RAMJI Scheme : केंद्र सरकार रोजगार योजनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरू असलेली हजारो कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून एप्रिलपासून नवीन रोजगार योजना लागू होणार आहे. यामुळे लाभार्थी आणि मजुरांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर. (VBG RAMJI Scheme)

VBG RAMJI Scheme : केंद्र सरकार रोजगार योजनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरू असलेली हजारो कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून एप्रिलपासून नवीन रोजगार योजना लागू होणार आहे. यामुळे लाभार्थी आणि मजुरांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर. (VBG RAMJI Scheme)

VBG RAMJI Scheme : केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेऐवजी (MGNREGA) नवीन विकसित भारत रोजगार व उपजीविका अभियान (VBG RAMJI Scheme) लागू करण्याचा निर्णय घेतला असून या योजनेची अंमलबजावणी एप्रिलपासून देशभर सुरू होणार आहे.(VBG RAMJI Scheme) 

त्यामुळे सध्या सुरू असलेली मनरेगा अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना रोहयो विभागाला देण्यात आल्या आहेत.(VBG RAMJI Scheme)

नवीन योजना लागू होण्यापूर्वी मंजूर झालेली सर्व कामे जुन्या निकषांनुसारच पूर्ण केली जाणार आहेत. मात्र नवीन कामांना एप्रिलपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात ६९ हजारांहून अधिक कामे सुरू

यवतमाळ जिल्ह्यात सध्या मनरेगा अंतर्गत तब्बल ६९,२५० कामे सुरू आहेत.

त्यामध्ये ४४,८३७ घरकुलांची कामे

१२,००० सिंचन विहिरी

५,७८० फळबाग प्रकल्प

१,५०० गोठे बांधकाम

तसेच रस्ते व इतर विकासकामांचा समावेश आहे.

ही सर्व कामे एप्रिलपूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.

नवीन योजनेतून पुढील कामे

एप्रिलपासून लागू होणाऱ्या 'व्हीबीजी रामजी' योजनेतूनच नवीन कामांना मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे सध्या मंजूर लाभार्थ्यांना नवीन कामांसाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मजुरांसाठी दिलासा

दरवर्षीप्रमाणे मनरेगा मजुरांच्या मजुरीत एप्रिल महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मजुरांना आर्थिक दिलासा मिळू शकतो.

नवीन योजनेत काही संरचनात्मक बदल करण्यात आले असून रोजगार संधी वाढण्याचे संकेतही मिळत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : VBG RAMJI Scheme : शेतमजुरांचा तुटवडा संपणार? 'व्हीबीजी रामजी'मुळे शेतीला मजूर उपलब्ध

अधिक वाचा : MGNREGA Scheme : तीन महिन्यांची प्रतीक्षा संपली; मजुरांच्या खात्यात येणार मोठी रक्कम वाचा सविस्तर

Web Title : वीबीजी रामजी योजना: अप्रैल में आएगी नई रोजगार योजना: विवरण

Web Summary : वीबीजी रामजी योजना अप्रैल में मनरेगा की जगह लेगी, जिससे मौजूदा परियोजनाओं को पूरा करने की होड़ मची है। अद्यतन योजना के तहत नई कार्य स्वीकृतियों का इंतजार कर रहे लाभार्थियों के लिए अनिश्चितता मंडरा रही है। अकेले यवतमाल जिले में 69,250 परियोजनाएँ चल रही हैं। मजदूरों के लिए वेतन वृद्धि की उम्मीद है।

Web Title : VBG RAMJI Scheme: New Employment Scheme Coming in April: Details

Web Summary : The VBG RAMJI Scheme replaces MGNREGA in April, prompting a rush to complete existing projects. Uncertainty looms for beneficiaries awaiting new work approvals under the updated scheme. Yavatmal district alone has 69,250 ongoing projects. Wage increases are expected for laborers.