Vayde Bajar Ban : भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) अर्थात सेबीने गहू आणि मूग यासह सात कृषी उत्पादनांच्या फ्युचर्स ट्रेडिंगवरील म्हणजेच वायदेबाजार बंदी मार्च २०२६ पर्यंत एका वर्षासाठी वाढवली आहे. सात कृषी उत्पादनांच्या किमती नियंत्रित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर, गहू आणि मूग यासह सात कृषी उत्पादनांचे फ्युचर्स ट्रेडिंग (Future Trading) शक्य होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वायदे बाजार अंतर्गत, गुंतवणूकदार भविष्यात निश्चित किमतीला कृषी उत्पादने (Crop Production) खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करार करतात. परंतु आता या निर्णयानंतर, गहू आणि मूग यासह सात कृषी उत्पादनांचे वायदे बाजार शक्य होणार नाही. सेबीने पहिल्यांदा १९ डिसेंबर २०२१ रोजी या उत्पादनांमध्ये वायदे बाजारावर (Vayde Bajar) बंदी घातली होती.
ही बंदी आधी २० डिसेंबर २०२२ पर्यंत होती, जी नंतर २० डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली. यानंतर ही बंदी २० डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर ही बंदी ३१ जानेवारी २०२५ पर्यंत आणि नंतर मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आली. आता सेबीने ३१ मार्च २०२६ पर्यंत निलंबन आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या सात कृषी उत्पादनांचे (बंदी घातलेला शेतमाल ) वायदे बाजार करता येणार नाही.
- भात (बासमती नसलेले)
- गहू
- हरभरा
- मोहरीचे दाणे, यापासून तयार केलेले पदार्थ उदा. मोहरीचे तेल.
- सोयाबीन, यापासून तयार केलेले पदार्थ उदा. सोयाबीन तेल.
- कच्चे पाम तेल
- हरभरा इत्यादी.
Kanda Bajarbhav : एप्रिलमध्ये कांदा बाजारभाव वाढतील का? वाचा सविस्तर