Lokmat Agro >शेतशिवार > Ustod Mahila Kamgar: 'आरोग्य मित्र'चा आधार! बीडमधील ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Ustod Mahila Kamgar: 'आरोग्य मित्र'चा आधार! बीडमधील ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

latest news Ustod Mahila Kamgar: Support from Arogya Mitra! Sugarcane harvesting in Beed is an important step for women's health | Ustod Mahila Kamgar: 'आरोग्य मित्र'चा आधार! बीडमधील ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Ustod Mahila Kamgar: 'आरोग्य मित्र'चा आधार! बीडमधील ऊसतोड महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांना दिलासा मिळणार आहे. 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra) उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य समस्यांवर होणार लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची महिला आयोगाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. (Ustod Mahila Kamgar)

Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांना दिलासा मिळणार आहे. 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra) उपक्रमामुळे महिलांच्या आरोग्य समस्यांवर होणार लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची महिला आयोगाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. (Ustod Mahila Kamgar)

शेअर :

Join us
Join usNext

Ustod Mahila Kamgar : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांना दिलासा मिळणार आहे. 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra)  उपक्रमामुळे महिलांच्याआरोग्य समस्यांवर होणार लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 'लोकमत'च्या वृत्ताची महिला आयोगाकडून तातडीने दखल घेण्यात आली आहे. (Ustod Mahila Kamgar)

बीड जिल्ह्यातील ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे अखेर शासनाचे लक्ष वेधले गेले असून, महिलांना आता 'आरोग्य मित्र' मिळणार आहेत. (Ustod Mahila Kamgar)

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, या 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra)महिलांचा समावेश अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्यासोबतच आरोग्य विभागाशी थेट संपर्कात असलेल्या लोकांमध्ये असेल.(Ustod Mahila Kamgar)

या उपक्रमाचे नेतृत्व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर करत असून, त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे घेतलेल्या बैठकीत बालविवाह, गर्भपिशवी शस्त्रक्रिया, महिला अत्याचार यावर सखोल चर्चा केली. या बैठकीस आरोग्य, पोलीस व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.(Ustod Mahila Kamgar)

'लोकमत'च्या वृत्ताची ठळक दखल!

२०१९ पूर्वी बीड जिल्ह्यात तब्बल ५७६ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली होती, तर नंतरही २६७ प्रकरणांची नोंद झाली. या गंभीर विषयावर 'लोकमत'ने सातत्याने प्रकाश टाकल्याने महिला आयोगाने तातडीने बैठक बोलावली आणि अंमलबजावणीस सुरुवात केली. त्याचबरोबर बालविवाहाच्या प्रकरणावरही आयोगाने दखल घेतली आहे.

आरोग्यप्रश्नी गंभीर चिंता

रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या गर्भपिशवी काढण्याच्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, महिलांचे आरोग्य हे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

सहकार विभागाने स्थलांतरित ऊसतोडणी करणाऱ्या महिलांसाठी आरोग्य व अन्य मूलभूत सुविधा पुरवाव्यात, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

प्रत्येक महिन्याला आढावा बैठक

महिलांना मिळणाऱ्या सेवा-सुविधांचा दर महिन्याला आढावा घेण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले.

जॉन्सन यांची संकल्पना

बीडसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत ऊसतोड महिला कामगार स्थलांतर करतात. त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या समोर आल्या आहेत. यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून यावर्षी 'आरोग्य मित्र' (Arogya Mitra) उपक्रम राबविण्यात येत आहे.

याअंतर्गत ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांसाठी त्याच समूहातील एकाची आरोग्य मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. आरोग्य मित्र आरोग्याच्या समस्यांबाबत आशासेविका, अंगणवाडी सेविकांच्या संपर्कात असेल.

हे ही वाचा सविस्तर : Ustod Mahila Kamgar: एक दिवसाचा खाडा… आणि तिचं आयुष्यच बदलून जातं! वाचा सविस्तर

Web Title: latest news Ustod Mahila Kamgar: Support from Arogya Mitra! Sugarcane harvesting in Beed is an important step for women's health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.