Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Unseasonal Rain Impact : क्षणात बदललं हवामान; शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

Unseasonal Rain Impact : क्षणात बदललं हवामान; शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

latest news Unseasonal Rain Impact: Weather changed in an instant; Farmers rush to save crops | Unseasonal Rain Impact : क्षणात बदललं हवामान; शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

Unseasonal Rain Impact : क्षणात बदललं हवामान; शेतमाल वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल

Unseasonal Rain Impact : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः पळापळ करत असून अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. (Unseasonal Rain Impact)

Unseasonal Rain Impact : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावाधाव सुरू झाली आहे. काढणीच्या टप्प्यावर असलेला शेतमाल वाचवण्यासाठी शेतकरी अक्षरशः पळापळ करत असून अनेक ठिकाणी गहू, हरभरा आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. (Unseasonal Rain Impact)

Unseasonal Rain Impact :निसर्गाच्या लहरीपणाचा फटका वणी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.(Unseasonal Rain Impact)

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच अवकाळी पाऊस व गारपिटीचे सत्र सुरू झाल्याने रब्बी पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होत आहे. यंदाही मार्चच्या मध्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.(Unseasonal Rain Impact)

दर २-३ वर्षांनी पुनरावृत्ती

गेल्या काही वर्षांपासून दर दोन ते तीन वर्षांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसत असल्याचे चित्र आहे.

२०२४ च्या मार्च-एप्रिलमध्ये, २०२३ च्या मार्चच्या सुरुवातीला तसेच २०१८ च्या फेब्रुवारीतही अशाच प्रकारे पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

गहू-हरभऱ्याला मोठा फटका

सध्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी पिकांची काढणी सुरू आहे. अनेक ठिकाणी वाळवण, कडबा बांधणी आणि गंजी लावण्याची कामे सुरू असताना अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

अनेकांनी काढलेला माल वाचवण्यासाठी झाकण्यासाठी धावाधाव केली, तर काहींना पावसापासून आसरा शोधावा लागला.

फळपिकांनाही फटका

या अवकाळी पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे. विशेषतः आंब्याच्या मोहरावर परिणाम झाला असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच भाजीपाला पिकांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

चार दिवसांत दोनदा पाऊस

गेल्या चार दिवसांत दोन वेळा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी गोंधळून गेले आहेत. काढणीच्या टप्प्यावर आलेली पिके धोक्यात आली असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

राज्यभर समान स्थिती

हीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांत पाहायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत आहे.

मदतीची अपेक्षा

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

प्रशासनाने त्वरित सर्वेक्षण करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर :Wheat Management : गव्हाचे काड जाळताय? थांबा! 'हा' उपाय न केल्यास जमिन होईल उजाड

अधिक वाचा : Agriculture News : शेतकऱ्यांनो, सावध राहा; 'ही' आग हिरावतेय हातातोंडाशी आलेला घास!

Web Title : बेमौसम बारिश से महाराष्ट्र में तबाही: फसल बचाने के लिए किसानों की भागदौड़

Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश और ओलावृष्टि से रबी फसलों और फलों के बागों को भारी नुकसान हो रहा है। किसान काटी गई फसलों और उपज को बचाने के लिए संघर्ष कर रहे हैं। अप्रत्याशित मौसम से आर्थिक संकट बढ़ रहा है, जिससे तत्काल सरकारी सहायता की मांग हो रही है।

Web Title : Unseasonal Rain Disrupts Maharashtra: Farmers Scramble to Save Crops

Web Summary : Unseasonal rains and hailstorms in Maharashtra are devastating Rabi crops and fruit orchards. Farmers are struggling to protect harvested grains and produce. The unpredictable weather patterns are causing significant economic distress, prompting calls for immediate government assistance and surveys of the damage.