Agriculture Budget 2026: आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत त्यांचे नववे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जात आहे. या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमके काय निर्णय घेतले गेले, हे थोडक्यात पाहुयात...
आज सादर होत असलेल्या केंद्रीय अर्थ संकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. विशेष करून या अर्थ संकल्पाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहेत. या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांसाठी काय योजना अंमलात आणण्याचे संकल्प करण्यात आले.
काही महत्वाचे मुद्दे पाहुयात...
- MSME योजनेसाठी १० हजार कोटींची तरतूद
- महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी शी-मार्ट्स आणि स्वयं-सहायता उद्योजक मार्ट्सची स्थापना केली जाईल.
- शेती आणि पीक उत्पादन वाढवण्यासाठी एआय टूल्स सुरू केले जातील.
- अक्रोड, बदाम आणि पाइन नट्सची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा आणि कमी उत्पादन देणाऱ्या बागांना पुनरुज्जीवित करण्याचा प्रस्ताव आहे.
- नारळ उत्पादन वाढवण्यासाठी नारळ संवर्धन योजना
- चंदनाची लागवड आणि प्रक्रिया वाढवण्यासाठी राज्यांच्या सहकार्याने काम केले जाईल.
- काजू आणि कोकोमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू केले जातील.
- किनारी भागातील नारळाचे उत्पादन वाढवण्याच्या आणि प्रमुख पिकांना आधार देण्याच्या योजना आहेत.
- पशुपालनासाठी कर्ज-संबंधित अनुदान योजना सुरू केली जाईल.
- मत्स्यपालनाला बळकटी देण्यासाठी ५०० नवीन जलाशय बांधले जातील.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी समावेशक विकासावर काम केले जाईल.
Read More : गज्जर तुरीपासून ते लाल तुरीपर्यंत, कुठल्या तुरीला सर्वाधिक मार्केट मिळतंय? वाचा सविस्तर
