Lokmat Agro >शेतशिवार > Unauthorized Seeds : खरीप हंगामात प्रतिबंधित बियाण्यांचा धोका वाढला; कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर वाचा सविस्तर

Unauthorized Seeds : खरीप हंगामात प्रतिबंधित बियाण्यांचा धोका वाढला; कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर वाचा सविस्तर

latest news Unauthorized Seeds: The risk of banned seeds has increased during the Kharif season; Read more on the Agriculture Department's 'Alert Mode' | Unauthorized Seeds : खरीप हंगामात प्रतिबंधित बियाण्यांचा धोका वाढला; कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर वाचा सविस्तर

Unauthorized Seeds : खरीप हंगामात प्रतिबंधित बियाण्यांचा धोका वाढला; कृषी विभाग 'अलर्ट मोड'वर वाचा सविस्तर

Unauthorized Seeds : राज्यात खरीप हंगाम काही दिवसांवर आला असताना, कपाशीच्या बियाण्याच्या मागणी लक्षात घेता बाजारात परवानगी नसलेल्या एचटीबीटी (HTBT) आणि एफटू (FT) वाणाच्या प्रतिबंधित बियाण्यांची विक्री झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने 'अलर्ट मोड' स्वीकारला आहे वाचा सविस्तर (Unauthorized Seeds)

Unauthorized Seeds : राज्यात खरीप हंगाम काही दिवसांवर आला असताना, कपाशीच्या बियाण्याच्या मागणी लक्षात घेता बाजारात परवानगी नसलेल्या एचटीबीटी (HTBT) आणि एफटू (FT) वाणाच्या प्रतिबंधित बियाण्यांची विक्री झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने 'अलर्ट मोड' स्वीकारला आहे वाचा सविस्तर (Unauthorized Seeds)

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात खरीप हंगाम काही दिवसांवर आला असताना, कपाशीच्या बियाण्याच्या मागणी लक्षात घेता बाजारात परवानगी नसलेल्या एचटीबीटी (HTBT) आणि एफटू (FT)वाणाच्या प्रतिबंधित बियाण्यांची विक्री झपाट्याने वाढत आहे.  (Unauthorized Seeds)

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने 'अलर्ट मोड' स्वीकारला असून, जळगाव, वर्धा, अमरावतीसारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तपासणी मोहीम राबवली जात आहे. (Unauthorized Seeds)

राज्यभरात खरीप हंगामात अडीच ते तीन कोटी पॅकेटस् कापसाचे बियाणे लागते. या बियाण्यासोबत परवानगी नसलेले एचटीबीटी बियाणे बाजारात भेसळ स्वरूपात शिरत आहे. साधारणतः २० टक्क्यांच्या जवळ ही भेसळ असण्याचा अंदाज आहे.  (Unauthorized Seeds)

१५ मे पासून सुरू होणाऱ्या विक्रीपूर्वी अशा बियाण्याला रोखण्यासाठी कृषी विभाग अलर्ट मोडवर आला आहे. अशा प्रकारची घुसखोरी वर्धा, जळगावअमरावतीमध्ये उघड झाल्याने राज्यातील सीमावर्ती भागाकडे कृषी विभागाच्या नजरा लागल्या आहेत.  (Unauthorized Seeds)

यावर्षी मोठ्या प्रमाणात बियाण्याची आवश्यकता भासणार आहे. यामुळे वेळेपूर्वी बियाणे बाजारात विकता यावे म्हणून बियाणे कंपन्यांनी नियोजन केले आहे. यासोबतच परवानगी नसलेले बियाणे बाजारात छुप्या मार्गाने प्रवेश करीत आहे. यावर्षीच्या हंगामात १.५० लाख हेक्टर क्षेत्रात जिल्ह्यात पेरणीचे नियोजन आहे.

जळगावमध्ये अशा दोन कारवाया उघड झाल्या. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात कृषी विभाग सतर्क झाला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकांनी अशा सर्व ठिकाणी लक्ष केंद्रित केले आहे. यात खासकरून मध्य प्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशातून अशा प्रकारचे बियाणे बाजारात आणले जात आहे.

बोगस बियाण्यांची विक्री करणारे थेट शेतकऱ्यांपर्यंत जात आहे. मध्यप्रदेशातूनही जळगाव मार्गे विदर्भात हे बियाणे दाखल होतात.  (Unauthorized Seeds)

शेतकऱ्यांनी जास्त उत्पादनाच्या अमिषाला बळी पडू नये. बियाण्याची उगवण क्षमता चांगली नसल्यास मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असते. बोगस बियाणे खरेदी करु नये, असे आवाहन केले आहे.

अप्रमाणित बियाण्यांचा धोका वाढणार!

या खरीप हंगामात कपाशीच्या लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने बियाण्याची मागणीही वाढेल. हाच संधीचा फायदा घेत विना परवाना बियाणे पुरवठादार सक्रिय झाले आहेत. या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याचा धोका वाढतो आहे.

बेरोजगार, शेतकऱ्यांशी हातमिळवणी

या बीटी बियाण्याला परवानगी नाही. यामुळे असे बियाणे थेट शेतकरी आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या माध्यमातून बाजारात दाखल होत आहे. शेतकरी ते शेतकरी असे बियाणे विकले जाते. या बियाण्याला कुठल्याही पावत्या मिळत नाहीत. यामुळे योग्य उत्पादन न आल्यास दाद मागता येत नाही.

एफटू वाणाचे बियाणे समजणार कसे?

सध्या बाजारात फक्त विना परवाना बीटीच नव्हे, तर एफटू बीटी बियाण्यांची ही विक्री होण्याची शक्यता आहे. एफटू म्हणजे दुसऱ्या पिढीतील बीटी वाण, ज्यांची उत्पादन क्षमता अनिश्चित असते. ही बीजे वापरल्यास नुकसान होण्याचा धोका असतो. सरळ वाणाच्या विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्यांनी अशा बियाण्याला बळी न पडता अधिकृत दुकानातून बियाण्याची खरेदी करावी. बिल घेऊनच बियाणे खरेदी करावे. - राजेश अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटना

हे ही वाचा सविस्तर : Bogus Seeds: बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाची असेल करडी नजर; जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Unauthorized Seeds: The risk of banned seeds has increased during the Kharif season; Read more on the Agriculture Department's 'Alert Mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.