Agriculture News : आज पीएम नरेंद्र मोदी यांनी दोन कृषी योजनांचे उद्घाटन केले आहे. प्रधानमंत्री धन-धन कृषी योजना आणि डाळी स्वावलंबी मिशन अशा दोन योजनांना सुरवात झाली असून जवळपास ३५ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
नवी दिल्लीतील पुसा येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुलातून या दोन महत्त्वाच्या योजनांचे अनावरण करण्यात आले. शेती, पशुपालन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया याशी संबंधित १ हजार १०० प्रकल्पांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि अन्न आणि डाळी उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण बनवणे आहे.
पंतप्रधान धन-धन कृषी योजना
- या योजनेसाठी २४ हजार कोटी रुपयांची तरतूद
- कमी उत्पादन देणाऱ्या १०० जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पादकता वाढवणे.
- पीक विविधता आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे.
- सिंचन सुविधा, साठवणूक आणि कर्ज देणे.
डाळी स्वावलंबन अभियान
- या योजनेसाठी ११ हजार ४४० कोटी रुपयांची तरतूद
- डाळींचे उत्पादन आणि क्षेत्र वाढवणे.
- मूल्य साखळी मजबूत करणे (खरेदी, साठवणूक, प्रक्रिया).
- उत्पादन तोटा कमी करणे आणि किमान आधारभूत किमतीवर १०० टक्के खरेदी सुनिश्चित करणे.
Read More : यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार का? काय आहे नेमका अंदाज, वाचा सविस्तर