Turmeric Crop Disease : हळद पिकावर अलीकडे करपा आणि कंदकुज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दमट हवामान, अति पाऊस आणि पाण्याचा ताण या कारणांमुळे हे रोग झपाट्याने पसरतात. (Turmeric Crop Disease)
या रोगामुळे पाने करपणे, कंद सडणे आणि उत्पादनात घट अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. कृषी तज्ज्ञांनी सुचवलेले काही प्रभावी उपाय जाणून घेऊया. (Turmeric Crop Disease)
सततचा परतीचा पाऊस आणि सलग पडणाऱ्या धुक्यामुळे हळद पिकांवर कंदकुज, करपा आणि पाने सडण्याचे रोग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. (Turmeric Crop Disease)
परिणामी हळद पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.(Turmeric Crop Disease)
हिंगोली जिल्ह्यात यंदा हळद लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. केळी आणि ऊसासारख्या पिकांच्या तुलनेत कमी पाण्यात आणि किफायतशीर उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून हळदीची लागवड शेतकरी करतात. (Turmeric Crop Disease)
मात्र, या वर्षीच्या हवामानातील अस्थिरतेने या पिकालाही फटका बसला आहे.(Turmeric Crop Disease)
१५ सप्टेंबरनंतर हळद पिकावर पान करपा आणि कंदकुज रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. विशेष म्हणजे, यावर्षी दोन्ही प्रकारचे करपे लवकर येणारा आणि उशिरा येणारा एकाच वेळी आल्याने नुकसान अधिक वाढले आहे.
शेतकऱ्यांच्या मते, ३० ते ४० टक्क्यांपर्यंत हळद पिकांचे नुकसान होऊ शकते. कंदमाशी आणि बुरशीजन्य संसर्गामुळे हळदीचे कंद पोखरले जाऊन कुजत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.(Turmeric Crop Disease)
हळदीला राज्याबाहेरही मोठी मागणी असल्याने या रोगराईमुळे हिंगोली जिल्ह्यातील उत्पादन घटल्यास बाजारभावावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (Turmeric Crop Disease)
सध्या धुके पडत असल्याने हळद पिक पिवळे पडून कंदसड, करपा वाढला आहे.- ज्ञानेश्वर शिंदे, शेतकरी
यावर्षी सारखा पाऊस झाल्याने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. कृषी सहाय्यक मार्गदर्शन देतात, पण हळदीवरील रोग नियंत्रणात येत नाहीत.- मारोती घ्यार, शेतकरी
हळदीवर करपा-कंदकुजवर उपाय
सेंद्रिय (Organic) उपाय
* निम अर्क (Neem extract ५%) किंवा काष्ठनाशक द्रावण फवारावे.
* जैविक बुरशीनाशके (Trichoderma viride, Pseudomonas fluorescens) वापरल्यास बुरशीचा प्रसार कमी होतो.
* गंधक आधारीत जैव फवारणी (Sulphur-based organic spray) उपयोगी ठरते.
प्रतिबंधात्मक उपाय
* चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी.
* रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा.
* ट्रायकोडर्मा विरिडी (Trichoderma viride) ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
* पिकात पाणी साचू देऊ नये.
कृषी विभागाने रोग नियंत्रणासाठी योग्य बुरशीनाशके आणि कीटकनाशकांची फवारणी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.
