Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane with AI : स्मार्ट सेंसर, स्मार्ट ऊस; 'या' कारखान्यात एआय प्रणालीने ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णय

Sugarcane with AI : स्मार्ट सेंसर, स्मार्ट ऊस; 'या' कारखान्यात एआय प्रणालीने ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णय

latest news Sugarcane with AI: Smart sensors, smart sugarcane; Decision to increase sugarcane production with AI system in 'this' factory | Sugarcane with AI : स्मार्ट सेंसर, स्मार्ट ऊस; 'या' कारखान्यात एआय प्रणालीने ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णय

Sugarcane with AI : स्मार्ट सेंसर, स्मार्ट ऊस; 'या' कारखान्यात एआय प्रणालीने ऊस उत्पादन वाढवण्याचा निर्णय

Sugarcane with AI : जुनी परंपरा आणि नव्या तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालत, सिद्धी शुगर कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) प्रणाली राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sugarcane with AI)

Sugarcane with AI : जुनी परंपरा आणि नव्या तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालत, सिद्धी शुगर कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) प्रणाली राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sugarcane with AI)

शेअर :

Join us
Join usNext

Sugarcane with AI :  जुनी परंपरा आणि नव्या तंत्रज्ञानाची अनोखी सांगड घालत, सिद्धी शुगर कारखान्याने २०२५-२६ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादन वाढवण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) प्रणाली राबवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sugarcane with AI)

प्रशिक्षण घेतलेल्या २५ शेतकऱ्यांच्या शेतांवर सेन्सर सिस्टम आणि वेदर स्टेशन बसवून ऊसशेतीला अधिक वैज्ञानिक आणि स्मार्ट बनवण्याचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे.(Sugarcane with AI)

सिद्धी शुगर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ च्या पूर्वतयारीस सुरुवात करत ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी 'कृत्रिम बुद्धिमत्ता' (AI) प्रणालीचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. (Sugarcane with AI)

श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी पार पडलेल्या पारंपरिक रोलर पूजन कार्यक्रमात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला.(Sugarcane with AI)

रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न

रोलर पूजनाचा कार्यक्रम माजी मंत्री बाळासाहेब जाधव आणि प्रगतशील शेतकरी उद्धवराव ईप्पर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना माजी मंत्री जाधव यांनी सांगितले की, यंदा मे महिन्यात झालेल्या पावसामुळे उसाच्या वाढीस चांगले पोषक वातावरण मिळाले आहे. त्यामुळे २०२५-२६ हंगामात ६.५ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.(Sugarcane with AI)

AI प्रणालीद्वारे ऊस शेतीत बदल

सिद्धी शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील २५ निवडक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या १ हेक्टर क्षेत्रावर सेन्सर सिस्टीम बसविण्यात येणार आहे, तसेच हवामानाची अचूक माहिती मिळवण्यासाठी एक 'वेदर स्टेशन' उभारले जाणार आहे. यामुळे पीक आरोग्य, खत व्यवस्थापन, सिंचन वेळ आणि इतर महत्त्वाचे घटक तांत्रिक पद्धतीने नियंत्रित करता येणार आहेत.(Sugarcane with AI)

प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव

ऊस शेतीतील नवकल्पना व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ शेतकऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

या शेतकऱ्यांमध्ये नामदेव बळीराम माकणे (नागठाणा), नारायण अंगद सूर्यवंशी (माकणी), अतुल कार्तिक घाटीवाले (उजना), नामदेव रामचंद्र बडगिरे (थोडगावाडी), किशोर पुरुषोत्तम लोहकरे (मोगा), नामदेव तुकाराम कदम (तांबटसांगवी), अजय बाळासाहेब जाधव (नागठाणा) यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला व्हाईस प्रेसिडेंट पी. जी. होनराव, जनरल मॅनेजर एस. आर. पिसाळ, बी. के. कावलगुडेकर, मुख्य अभियंते मुलानी, बी. डी. सोमवंशी, अमोल भुमरे, आनंद पाटील, तसेच अनेक वरिष्ठ अधिकारी व तांत्रिक सल्लागार यांच्यासह शेतकरी वर्गही  मोठ्या संख्येने उपस्थित होता.

एआय प्रणालीच्या वापरामुळे उस उत्पादनात निश्चितच मोठा बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून, सिद्धी शुगर हा आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारा अग्रगण्य कारखाना ठरणार आहे. या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन आणि कारखान्याला अधिक कार्यक्षम गळीत हंगामाची हमी मिळेल.

हे ही वाचा सविस्तर : Shetmal Market : हरभऱ्याच्या किमतीत उसळी; सरकारचा गहू-तांदळासाठी मोठा निर्णय वाचा सविस्तर

Web Title: latest news Sugarcane with AI: Smart sensors, smart sugarcane; Decision to increase sugarcane production with AI system in 'this' factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.