Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Cultivation : ऊस लागवडीत भरारी! यंदा 'या' जिल्ह्यांची साखर उत्पादनात विक्रमी झेप वाचा सविस्तर

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीत भरारी! यंदा 'या' जिल्ह्यांची साखर उत्पादनात विक्रमी झेप वाचा सविस्तर

latest news Sugarcane Cultivation: Sugarcane cultivation boom! These districts have a record jump in sugar production this year. Read in detail | Sugarcane Cultivation : ऊस लागवडीत भरारी! यंदा 'या' जिल्ह्यांची साखर उत्पादनात विक्रमी झेप वाचा सविस्तर

Sugarcane Cultivation : ऊस लागवडीत भरारी! यंदा 'या' जिल्ह्यांची साखर उत्पादनात विक्रमी झेप वाचा सविस्तर

Sugarcane Cultivation : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे समाधानकारक वातावरण, ऊसाला मिळालेली चांगली बाजारपेठ आणि साखर कारखान्यांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदा ऊस लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Cultivation)

Sugarcane Cultivation : मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे समाधानकारक वातावरण, ऊसाला मिळालेली चांगली बाजारपेठ आणि साखर कारखान्यांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदा ऊस लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Cultivation)

शेअर :

Join us
Join usNext

बापू सोळुंके 

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे समाधानकारक वातावरण, ऊसाला मिळालेली चांगली बाजारपेठ आणि साखर कारखान्यांकडून मिळालेला प्रतिसाद यामुळे यंदा ऊस लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ झाली आहे. (Sugarcane Cultivation)

प्रादेशिक सहसंचालकांच्या अहवालानुसार, या सहा जिल्ह्यांत तब्बल पावणेदोन लाख हेक्टरवर ऊस लागवड झाली असून, ही मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल २५ टक्क्यांनी अधिक आहे. यामुळे २०२५-२६ मध्ये एकूण १.२७ कोटी मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.(Sugarcane Cultivation)

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील पावसाचे समाधानकारक चित्र, तसेच शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे वाढता कल पाहता यावर्षी सुमारे पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ लक्षात घेता, यंदा एकूण १ कोटी २६ लाख ९६ हजार २२१ मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Sugarcane Cultivation)

उसाची वाढती लागवड 

गेल्यावर्षीपासून सातत्याने समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी पुन्हा ऊस शेतीकडे वळताना दिसत आहेत. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सहा जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

जिल्हावार ऊस लागवड आणि साखर उत्पादनाचा अंदाज

जिल्हालागवड क्षेत्र (हे.)अंदाजित साखर उत्पादन (मे. टन)
छत्रपती संभाजीनगर३३,९६१२५,४७,०७५
जालना४५,३१७३१,७२,१९०
बीड६३,१८२४७,३८,६५०
नंदुरबार२३,१६११७,३७,६७५
धुळे२,९८९२,२४,१७५
जळगाव२,५६७१,९२,५२५

एकूण उत्पादन: १ कोटी २६ लाख ९६ हजार २२१ मेट्रिक टन साखर (सहा जिल्हे एकत्रित)

प्रति हेक्टर उत्पादनातील भिन्नता

प्रत्येक जिल्ह्यातील ऊस उत्पादकतेत थोडाफार फरक असून, प्रति हेक्टर सरासरी उत्पादकता ७४ टन इतकी आहे.

छत्रपती संभाजीनगर: ७५ टन/हे.

जालना: ७० टन/हे.

बीड: ७५ टन/हे.

उत्तर महाराष्ट्र (नंदुरबार, धुळे, जळगाव): ७५ टन/हे.

पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत उत्पादकतेत फरक

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ऊस उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली असली तरीही, पश्चिम महाराष्ट्रातील तुलनात्मकदृष्ट्या अद्याप ती काहीशी कमी आहे. मात्र, शाश्वत पाणी व्यवस्थापन, योग्य वेळचे पेरणी तंत्र, आणि तांत्रिक मार्गदर्शन यामुळे भविष्यात या भागातील उत्पादकतेत वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा उसावर भर, साखर कारखान्यांची तयारी

साखर कारखान्यांनीही यावर्षीच्या वाढीव उत्पादनाचा अंदाज लक्षात घेता, क्रशिंग क्षमता वाढवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. काही कारखाने आधीच यांत्रिक सुधारणा आणि नव्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करत आहेत.

यंदाच्या पावसाळ्यातील सकारात्मक चित्रामुळे उसाच्या लागवडीत मोठी वाढ झाली आहे. ऊस उत्पादकतेत सातत्य राखण्यासाठी तंत्रज्ञान, सिंचन, आणि बाजारपेठेचा योग्य मेळ आवश्यक आहे. शेतकरी व साखर कारखाने दोघेही यंदाच्या हंगामाकडून भरघोस अपेक्षा बाळगून आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Factory : कारखान्याचं कारस्थान? कोट्यवधींच्या रकमेवरून कामगार आक्रमक वाचा सविस्तर

Web Title: latest news Sugarcane Cultivation: Sugarcane cultivation boom! These districts have a record jump in sugar production this year. Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.