Lokmat Agro >शेतशिवार > Sugar Crushing Season: अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर

Sugar Crushing Season: अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर

latest news Sugarcane Crushing Season: Sugar crushing is finally over; This year's season turned out to be 'bitter' rather than 'sweet' Read in detail | Sugar Crushing Season: अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर

Sugar Crushing Season: अखेर साखर गाळप संपलं; यंदाचा हंगाम 'गोड' न ठरता 'कडवट' ठरला वाचा सविस्तर

Sugarcane Crushing Season : राज्यात अखेर २०२४-२५ या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. साखर आयुक्तालयाने अंतिम गाळप (Sugarcane Crushing Season) अहवाल जाहीर केला असून यंदा २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. वाचा सविस्तर (Sugarcane Crushing Season)

Sugarcane Crushing Season : राज्यात अखेर २०२४-२५ या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. साखर आयुक्तालयाने अंतिम गाळप (Sugarcane Crushing Season) अहवाल जाहीर केला असून यंदा २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. वाचा सविस्तर (Sugarcane Crushing Season)

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : राज्यात अखेर २०२४-२५ या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. साखर आयुक्तालयाने अंतिम गाळप अहवाल जाहीर केला असून यंदा २०० साखर कारखान्यांनी गाळप केले. (Sugarcane Crushing Season)

मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. कमी ऊस क्षेत्र, हवामानातील बदल आणि साखर उताऱ्यात घट यामुळे हंगाम अपेक्षेपेक्षा कमी गोड ठरला आहे.  (Sugarcane Crushing Season)

राज्यातील लांबलेल्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. यंदाच्या हंगामातील २०० साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून साखर आयुक्तालयाने अखेर शेवटचा गाळप अहवाल जारी केला आहे.  (Sugarcane Crushing Season)

यंदा राज्यातील ९९ सहकारी आणि १०१ खाजगी असे मिळून २०० साखर कारखान्यांनी गाळप केले होते. तर मागच्या हंगामात म्हणजेच २०२३-२४ या हंगामात राज्यातील २०८ साखर कारखान्यांनी गाळप केले होते. मागील हंगामाच्या तुलनेत यंदा मात्र उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादनही कमी झाले असून साखर उतारा घटला आहे.  (Sugarcane Crushing Season)

साखर उत्पादन किती?

* यंदाच्या हंगामात ८ कोटी ५४ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. तर ८१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

* मागील हंगामात मात्र १० कोटी ७६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप आणि ११० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. मागच्या वर्षीच्या तुलनेत राज्यात २९ लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले आहे.
 
* यंदा साखर उतारा हा ९.४८% एवढा होता. तर मागच्या हंगामातील साखर उतारा हा १०.२७% एवढा होता.

ऊस क्षेत्र कमी

* ऊस गाळप हंगाम २०२३-२४ च्या तुलनेत यंदा उसाखालील क्षेत्र हे १ लाख हेक्टरने कमी होते. त्यानुसार गाळप हंगाम हा मार्च महिन्यापर्यंत चालण्याची शक्यता होती पण मे महिन्याच्या मध्यापर्यंत गाळप हंगाम चालला आहे.

* काही कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये राहिलेला ऊस आता संपला असून अधिकृतरित्या गाळपाची सांगता झाली आहे.

आतापर्यंतचा गाळप हंगाम

हंगामगाळप कारखानेगाळप (मेट्रिक टन)साखर उत्पादन (लाख टन)साखर उतारा (%)
२०२३-२४२०८१०.७६ कोटी११०१०.२७
२०२४-२५२००८.५४ कोटी८१९.४८

विभागवार साखर उत्पादन

विभागसाखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)
कोल्हापूर२२४.६
पुणे २०१.७७
सोलापूर१०७.५७
अहिल्यानगर१०२.१६
छत्रपती संभाजीनगर६५.२५
नांदेड९५.४६
अमरावती१०.३४
नागपूर१.९३

 हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Fodder: दुभत्या जनावरांची झाली सोय; उसाच्या चाऱ्याला मिळतोय बाजारपेठेत सर्वाधिक दर

Web Title: latest news Sugarcane Crushing Season: Sugar crushing is finally over; This year's season turned out to be 'bitter' rather than 'sweet' Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.