किल्लारी : दीर्घ प्रतिक्षेनंतर नव्याने नूतनीकरण करून सुरू झालेल्या किल्लारी येथील निळकंठेश्वर साखर कारखान्याने पहिल्याच हंगामात उत्साहवर्धक कामगिरी नोंदवली आहे. (Sugarcane Crushing)
सुरुवातीलाच तब्बल १८ हजार मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण करून कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास जिंकला आहे. हंगामातील पहिल्या साखर पोत्याचे पूजन खासदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते विधिवत पार पडले. (Sugarcane Crushing)
आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते पहिल्या साखर पोत्याचे पूजन होताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आधुनिक तंत्रज्ञानासह सुरू झालेला हा कारखाना शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत असून, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही नवसंजीवनी मिळत आहे.(Sugarcane Crushing)
कारखान्याला गतवैभव मिळणार
किल्लारी परिसरात साखर कारखाना पुन्हा सुरू झाल्यानंतर दिवसाला दोन हजार टनांचे क्रशिंग यशस्वीरीत्या सुरू आहे. यामुळे कारखान्याचे वातावरण पुन्हा गजबजले असून, स्थानिक व्यापारी वर्ग, ऊस उत्पादक शेतकरी, आणि बाजारपेठ यांना नवचैतन्य मिळाले आहे. किल्लारीची बाजारपेठ पुन्हा ग्राहकांच्या गर्दीने फुलली आहे.
पूजन कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती
साखर पोत्याच्या पूजन कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये संतोष बेंबडे, कार्यकारी संचालक डी. एल. पतंगे, सेक्रेटरी तुकाराम पवार, व्हीएसआयचे शास्त्री, चीफ इंजिनिअर भोसले, चीफ केमिस्ट अण्णासाहेब मोरे, अकाउंटंट संतोष वाडीकर, मुख्य शेतकी अधिकारी कल्याण शिंदे, ऊस पुरवठा अधिकारी युवराज धुमाळ, सिव्हिल इंजिनिअर गणेश शिंदे यांचा समावेश होता.
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या कारखान्याला पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून अथक परिश्रम घेतले.
त्यांच्या प्रयत्नांमुळे कारखाना संपूर्ण आधुनिकीकरणासह नव्याने उभा राहिला
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली
गाळपक्षमता वाढली
आणि कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला
किल्लारीसह दोन जिल्हे आणि चार तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा कारखाना पुन्हा सुरू होणे म्हणजे मोठा दिलासा ठरला आहे.
वाहतूक खर्चात बचत, वेळेवर गाळप आणि योग्य दराची खात्री यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची चमक दिसत आहे.
स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळाली नवसंजीवनी
कारखान्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत
किल्लारीची अर्थव्यवस्था पुन्हा गतीमान होत आहे
दुकानदारी, वाहतूक, हॉटेल व्यवसाय-अनुषंगिक क्षेत्रे फुलत आहेत
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे चालना मिळत आहे.
हंगामाचे उद्दिष्ट ३ लाख मेट्रिक टन
या हंगामात सुमारे तीन लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवले आहे. सुरुवातीपासूनच गाळपाचा वेग समाधानकारक असून यावर्षीची कामगिरी उत्तम असेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
ग्रामविकासाची नवी दिशा
नूतनीकरणानंतर पुन्हा उभा राहिलेला निळकंठेश्वर साखर कारखाना
शेतकरी हिताचा, स्थानिक विकासाचा आणि औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय ठरत आहे. ग्रामीण भागातील औद्योगिक पुनरुज्जीवनाचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
