Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Sugarcane Crushing : वसमतमध्ये गाळप अंतिम टप्प्यात; कोणत्या कारखान्याने किती गाळप केले?

Sugarcane Crushing : वसमतमध्ये गाळप अंतिम टप्प्यात; कोणत्या कारखान्याने किती गाळप केले?

latest news Sugarcane Crushing: Crushing in the final stages in Vasmat; Which factory crushed how much? | Sugarcane Crushing : वसमतमध्ये गाळप अंतिम टप्प्यात; कोणत्या कारखान्याने किती गाळप केले?

Sugarcane Crushing : वसमतमध्ये गाळप अंतिम टप्प्यात; कोणत्या कारखान्याने किती गाळप केले?

Sugarcane Crushing : वसमत विभागातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत तब्बल १० लाख ४७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून साखर आणि गूळ कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा रंगली आहे. फेब्रुवारीअखेर कारखान्यांची धुराडे शांत होणार का? जाणून घ्या सविस्तर अपडेट. (Sugarcane Crushing)

Sugarcane Crushing : वसमत विभागातील ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत तब्बल १० लाख ४७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले असून साखर आणि गूळ कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा रंगली आहे. फेब्रुवारीअखेर कारखान्यांची धुराडे शांत होणार का? जाणून घ्या सविस्तर अपडेट. (Sugarcane Crushing)

Sugarcane Crushing : यंदाचा ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला असून वसमत विभागात आतापर्यंत तब्बल १० लाख ४७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. (Sugarcane Crushing)

विभागातील तीन प्रमुख साखर कारखान्यांसह १४ गूळ कारखान्यांनी यंदाच्या हंगामात मोलाची भूमिका बजावली आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी अखेरपर्यंत संपण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.(Sugarcane Crushing)

अनुकूल हवामानाचा फायदा

हंगामाच्या सुरुवातीपासून हवामान अनुकूल राहिल्याने उसाचे उत्पादन समाधानकारक झाले. त्यामुळे कारखान्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने गाळप प्रक्रिया राबवली.

काही ठिकाणी वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्या; मात्र प्रशासन व कारखाना व्यवस्थापनाच्या समन्वयामुळे गाळप सुरळीत सुरू राहिले.

गूळ कारखान्यांचा ‘गोडवा’ अधिक

तालुक्यातील कुरुंदा, किन्होळा, बोराळा, भेंडेगाव आदी ठिकाणी सुरू असलेल्या १४ गूळ कारखान्यांनी यंदा साखर कारखान्यांना चांगली टक्कर दिली. या गूळ कारखान्यांनी एकूण १ लाख ३० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

विशेष म्हणजे, काही गूळ कारखान्यांनी उसाला २ हजार ७०० रुपये प्रतिटन दर देत शेतकऱ्यांना आकर्षित केले. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

साखर कारखान्यांची कामगिरी

विभागातील दोन सहकारी व एका खासगी साखर कारखान्यांनी मिळून गेल्या साडेतीन महिन्यांत ९ लाख १७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

पूर्णा सहकारी साखर कारखाना ४ लाख ८ हजार मेट्रिक टन

कपीश्वर साखर कारखाना – ३ लाख ६४ हजार मेट्रिक टन (१०४ दिवसांत)

टोकाई सहकारी साखर कारखाना – १ लाख ४५ हजार मेट्रिक टन

फेब्रुवारीअखेर पडणार पडदा

बहुतांश गूळ कारखान्यांनी गाळप बंद केले असून उर्वरित कारखाने मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

साखर कारखान्यांकडे उपलब्ध उसाच्या प्रमाणावरून त्यांचाही हंगाम फेब्रुवारीअखेर संपेल, असे प्रशासकीय सूत्रांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हंगाम

एकूण उत्पादनाच्या दृष्टीने यंदाचा हंगाम सकारात्मक ठरला आहे. चांगले उत्पादन, वेळेवर गाळप आणि स्पर्धात्मक दर यामुळे वसमत विभागातील ऊस उत्पादकांना यंदा दिलासा मिळाला आहे.

मार्चच्या सुरुवातीलाच कारखान्यांची धुराडे शांत होण्याची चिन्हे दिसत असली तरी, यंदाचा गाळप हंगाम उत्पादन आणि दर या दोन्ही बाबतीत समाधानकारक ठरल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Sugarcane Crushing : ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; किल्लारी कारखान्याने गाठला विक्रमी गाळप टप्पा वाचा सविस्तर

अधिक वाचा :Ustod Mahila Kamgar : कोर्टाच्या आदेशाला फाटा? बीडमध्ये गर्भवती महिलांकडून ऊसतोड सुरूच!

Web Title : वसमत में गन्ना पेराई अंतिम चरण में: फैक्ट्री-वार पेराई विवरण

Web Summary : वसमत में गन्ना पेराई का मौसम समाप्ति की ओर है, 10 लाख मीट्रिक टन से अधिक का प्रसंस्करण हुआ। तीन चीनी मिलों और 14 गुड़ इकाइयों ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। अनुकूल मौसम ने उत्पादन को बढ़ावा दिया, और परिवहन समस्याओं के बावजूद, पेराई सुचारू रूप से जारी रही। चीनी मिलें फरवरी के अंत तक काम पूरा कर सकती हैं।

Web Title : Sugarcane Crushing Nears End in Vasmat: Factory-wise Crushing Details

Web Summary : Vasmat's sugarcane crushing season is nearing completion, with over 1 million metric tons processed. Three sugar factories and 14 jaggery units played key roles. Favorable weather boosted production, and despite transport issues, crushing continued smoothly. Sugar factories may conclude operations by February end.