Lokmat Agro >शेतशिवार > Pik Vima Yojana : स्ट्रॉबेरीलाही मिळालं पीक विमा संरक्षण, नाशिकच्या शेतकऱ्यांना महत्वाचे!

Pik Vima Yojana : स्ट्रॉबेरीलाही मिळालं पीक विमा संरक्षण, नाशिकच्या शेतकऱ्यांना महत्वाचे!

Latest News Strawberries also get crop insurance coverage, important for Nashik farmers | Pik Vima Yojana : स्ट्रॉबेरीलाही मिळालं पीक विमा संरक्षण, नाशिकच्या शेतकऱ्यांना महत्वाचे!

Pik Vima Yojana : स्ट्रॉबेरीलाही मिळालं पीक विमा संरक्षण, नाशिकच्या शेतकऱ्यांना महत्वाचे!

Pik Vima Yojana : या भागातील महत्वपूर्ण पीक असलेले स्ट्रॉबेरी देखील फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

Pik Vima Yojana : या भागातील महत्वपूर्ण पीक असलेले स्ट्रॉबेरी देखील फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : एकीकडे शेतकरी पीक विमा योजनेकडे  (Pik Vima Yojana) पाठ फिरवत असताना दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील, सुरगाणा, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता या भागातील महत्वपूर्ण पीक असलेले स्ट्रॉबेरी देखील फळ पीक विमा योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील (Nashik Farmers) कळवण, सुरगाणा तालुक्यात १०० टक्के आदिवासी समाज वास्तव्यास असून या भागात भात पीक घेतले जाते. मात्र काही वर्षात या भागात स्ट्रॉबेरीचे पीक लक्ष वेधून घेत आहे. अभोणा, सुकापूर, देवळीकराड, वडपाडा, लिंगामे व देवळीवणी बिलवाडी या भागात स्ट्रॉबेरी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. 

आदिवासी शेतकऱ्यांचे हे एकमेव नगदी पीक आहे. परंतु काही वेळा अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीमुळे स्ट्रॉबेरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत फळपीक विमा योजनेमध्ये कळवण व सुरगाणा तालुक्यांतील स्ट्रॉबेरीचा समावेश करण्याची फळउत्पादकांची होती. अखेर या मागणीला यश आले असून फळ पीक विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांतील स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. 

स्ट्रॉबेरी या फळपिकासाठी कृषी विभागाने समाविष्ट केलेल्या गावांमध्ये सातारा जिल्ह्यातील गावे वगळता राज्यभरातील इतर एकही स्ट्रॉबेरी उत्पादन करणाऱ्या गावांचा समावेश विमा योजनेत नव्हता. कळवण व सुरगाणा तालुक्यात देखील स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात असल्यामुळे पीक विमा योजनेत कळवण व सुरगाणा तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
- नितीन पवार, आमदार, कळवण

Web Title: Latest News Strawberries also get crop insurance coverage, important for Nashik farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.