Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Seeds: स्वयंपूर्णतेकडे वाटचाल! वाशिमचे शेतकरी बनले बियाणे उत्पादक वाचा सविस्तर

Soybean Seeds: स्वयंपूर्णतेकडे वाटचाल! वाशिमचे शेतकरी बनले बियाणे उत्पादक वाचा सविस्तर

latest news Soybean Seeds: Moving towards self-sufficiency! Washim farmers become seed producers Read in detail | Soybean Seeds: स्वयंपूर्णतेकडे वाटचाल! वाशिमचे शेतकरी बनले बियाणे उत्पादक वाचा सविस्तर

Soybean Seeds: स्वयंपूर्णतेकडे वाटचाल! वाशिमचे शेतकरी बनले बियाणे उत्पादक वाचा सविस्तर

Soybean Seeds : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात तब्बल २ लाख ५८ हजार ४३० क्विंटल गुणवत्तापूर्ण घरगुती सोयाबीन बियाणे तयार केले आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करताना दिसत आहेत. (Soybean Seeds)

शेअर :

Join us
Join usNext

या बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून अधिक असल्याचे चाचण्यांद्वारे सिद्ध झाले आहे. खरिपात पेरणीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा बियाणे टंचाईची स्थिती असल्यास खासगी बियाणे कंपन्यांचे बियाणे शेतकऱ्यांना वेळेत व पुरेसे उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर गुणवत्तापूर्ण बियाणे मिळण्यासाठी घरगुती बियाण्यांची निर्मिती प्रभावी उपाय ठरतो. (Soybean Seeds)

त्यामुळेच कृषी विभागाच्यावतीने गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या सहभागाने गुणवत्तापूर्ण घरगुती बियाण्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नवीन वाणांचा वापर वाढविणे, तसेच बियाणे बदल दरामध्ये वाढ करण्याचा प्रयत्नही या कार्यक्रमातून करण्यात येत आहे. (Soybean Seeds)

मागील वर्षी या अंतर्गत जिल्ह्यात २३ हजार १९० हेक्टरमधून ३ लाख ८६० क्विंटल घरगुती बियाणे निर्मितीचे उद्दिष्ट कृषी विभागाने निश्चित केले होते. यामध्ये १४ हजार ६९५ शेतकऱ्यांनी सहभाग घेत २ लाख ९२ हजार ४७ क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा साठा राखून ठेवला. या बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यात आली. २ लाख ५८ हजार ४३० क्विंटल बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून अधिक आहे. (Soybean Seeds)

आवश्यकतेपेक्षा अधिक बियाण्यांची उपलब्धता

जिल्ह्यात यंदा ३,०३,२०० हेक्टरवर सोयाबीन पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यासाठी प्रती हेक्टर ७५ किलो प्रमाणे २,२७,४०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे, तर ३५ टक्के बियाणे बदलानुसार बाजारातील ७९,५९० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. अर्थात बियाणे बदलाचे प्रमाण वगळता स्थानिक पातळीवर केवळ १,४७, ८१० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे दुप्पट बियाणे उपलब्ध आहेत.

शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी घरगुती बियाणे तयार करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन केले. या अंतर्गत १२,९९२ शेतकऱ्यांनी ७० टक्क्यांपेक्षा अधिक उगवण क्षमतेचे २,५८,४३० क्विंटल सोयाबीन बियाणे तयार केले. - संतोष वाळके, उपविभागीय कृषी अधिकारी, वाशिम

बियाणे तयार करणारे शेतकरी  

तालुकाबियाणे तयार करणारे शेतकरी (संख्या)
वाशिम२,५९५
कारंजा२,३५०
मंगरुळपीर२,३००
मानोरा२,१५०
रिसोड२,४१०
मालेगाव२,०९०
एकूण१३,८९५

 घरगुती बियाण्यांचा साठा (७०% उगवण क्षमतेसह)

तालुकाघरगुती बियाणे साठा (क्विंटलमध्ये)
कारंजा४३,८५०
मंगरुळपीर४१,२००
मालेगाव४९,५००
रिसोड५१,७६०
वाशिम४७,५३०
मानोरा२४,५९०
एकूण२,५८,४३०

हे ही वाचा सविस्तर : Soybean Crop: मूर्तिजापूरच्या शेतकऱ्यांचा पुन्हा 'सोयाबीन'वर विश्‍वास! वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Seeds: Moving towards self-sufficiency! Washim farmers become seed producers Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.