Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Crop Damage : मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर

Soybean Crop Damage : मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर

latest news Soybean Crop Damage: Heavy rains hit; Soybean production halved Read in detail | Soybean Crop Damage : मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर

Soybean Crop Damage : मुसळधार पावसाचा फटका; सोयाबीन उत्पादन अर्ध्यावर वाचा सविस्तर

Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल इतके राहिले आहे. (Soybean Crop Damage)

Soybean Crop Damage : पश्चिम विदर्भातील मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून, मिश्र पिकांमधील सोयाबीनचे एकरी उत्पादन २.५ ते ३ क्विंटल इतके राहिले आहे. (Soybean Crop Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Crop Damage : चालू खरीप हंगामात पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. (Soybean Crop Damage)

वाशिम, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, यंदा उत्पादन जवळपास अर्ध्यावर आले आहे. (Soybean Crop Damage)

एकरी उत्पादनात घसरण

मिश्र पिकांमध्ये लागवड केलेल्या सोयाबीनचे एकरी उत्पादन केवळ २.५ ते ३ क्विंटल इतके मिळत आहे.

केवळ सोयाबीन लागवड केलेल्या शेतातही उत्पादन ३ ते ४ क्विंटल पेक्षा जास्त नाही.

गतवर्षी सरासरी उत्पादन ६ ते ७ क्विंटल प्रति एकर इतके होते, त्यामुळे यंदाची घसरण शेतकऱ्यांसाठी मोठा धक्का ठरली आहे.

जिल्हानिहाय एकरी उत्पादन (खरीप हंगाम २०२४)

जिल्हासरासरी उत्पादन (क्विंटल)
अमरावती७.२८
बुलढाणा६.०७
यवतमाळ५.७९
वाशिम६.७६
अकोला५.८७

वाशिम तालुक्यातील खडसिंग येथे २२ सप्टेंबर रोजी मिश्र पिकातील सोयाबीन काढणी केली असता, शेतकऱ्यांना एकरी अडीच ते तीन क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले.

पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम

ओले दाणे आणि कमी उष्ण वातावरणामुळे आर्द्रता कमी करणे शक्य होत नाही.

त्यामुळे प्रत्यक्ष विक्रीसाठी उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांच्या मते, खत, बियाणे, मजुरी आणि औषध यावर खर्च करूनही लागवडीचा खर्च वसूल करणे कठीण झाले आहे.

आर्थिक परिणाम आणि पुढील हंगामासाठी चिंता

तालुका कृषी अधिकारी अतुल जावळे यांनी सांगितले की, पिकातील घट आणि आर्द्रतेमुळे शेतकऱ्यांना विक्रीसाठी अतिरिक्त आव्हाने येऊ शकतात. यंदाची परिस्थिती पुढील हंगामासाठी आर्थिक संकट निर्माण करणार असून, अनेक शेतकरी पिकाचा खर्च वसूल करण्यासही अडचणीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन

ओले सोयाबीन साठवताना आर्द्रता कमी करण्यासाठी योग्य साठवण व्यवस्था करणे आवश्यक.

नुकसान भरपाईसाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

पुढील हंगामासाठी पिकाचे नियोजन आणि पाणी व्यवस्थापन सुधारण्याचा सल्ला दिला जातो.

हे ही वाचा सविस्तर : Adivasi Women Empowerment : महिला सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती योजनेत अर्ज करण्याची संधी वाचा सविस्तर

Web Title: latest news Soybean Crop Damage: Heavy rains hit; Soybean production halved Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.