Solar Pump Scheme : सध्या अनेक शेतकऱ्यांना सोलर पंपाची वर्क ऑर्डर मिळाली आहे. पण काही ठिकाणी वर्क ऑर्डरची तारीख संपूनही अजून सोलर पंप बसवण्यात आलेला नाही, अशी तक्रार अनेक शेतकरी करत आहेत. शेतकरी सर्व कागदपत्रे पूर्ण करूनही अजून वाट पाहत आहेत. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की वर्क ऑर्डर दिल्यानंतरही सोलर पंप बसवायला उशीर का होत आहे?
महावितरणच्या 'मागेल त्याला सोलर पंप' योजनेअंतर्गत वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर, अधिकृत एजन्सीला ६० दिवसांच्या आत सौर पंपाची स्थापना (Installation) पूर्ण करणे बंधनकारक आहे. कामात विलंब झाल्यास महावितरणच्या टोल-फ्री क्रमांकावर (१८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५) तक्रार नोंदवता येते.
वर्क ऑर्डरनंतर जॉईंट सर्वे आणि त्यानंतर पंपाचे वाटप व बसवण्याचे काम केले जाते. मात्र याच कामासाठी उशीर होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देताना मोठी अडचण येत आहे. संबंधित विभागाने आणि कंपनीने याकडे लवकर लक्ष देणे गरजेचे आहे.
वर्क ऑर्डर मिळाल्यानंतरची प्रक्रिया :
जॉईंट सर्वे (Joint Survey) : वर्क ऑर्डर मिळाल्यावर, एजन्सी आणि शेतकरी मिळून जागेचा सर्वे करतात, जिथे पंपाची क्षमता आणि जागा निश्चित केली जाते.
स्थापना (Installation) : सर्वे पूर्ण झाल्यानंतर ६० दिवसांच्या आत, निव्वळ ५ ते ७ दिवसांत ५ HP पर्यंतचे पंप बसवले जातात.
दस्तऐवज (Documents) : वर्क ऑर्डरची कॉपी, जमिनीचा पुरावा आणि आधार कार्ड तयार ठेवावे.
तक्रार निवारण : जर ६० दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल, तर महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा संबंधित एजन्सीकडे तक्रार करावी.
हेही वाचा : घरावरील सौरऊर्जा प्रकल्प 15 हजार रुपयांनी स्वस्त मिळणार, 'या' ग्राहकांना मिळणार लाभ
