Lokmat Agro >शेतशिवार > Solar Pump Yojana : सोलर प्लांटला एक्सट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : सोलर प्लांटला एक्सट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Solar Pump Yojana possible to install extra panels on solar plant see details | Solar Pump Yojana : सोलर प्लांटला एक्सट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : सोलर प्लांटला एक्सट्रा पॅनल लावू शकतो का? जाणून घ्या सविस्तर 

Solar Pump Yojana : सोलर पंप (Solar Pump Yojana) योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवून घेतले आहेत.

Solar Pump Yojana : सोलर पंप (Solar Pump Yojana) योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवून घेतले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Solar Pump Yojana : मागेल त्याला सोलर पंप योजना (Solar Pump Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप देण्यात येतात. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी सहभागी होत आपल्या शेतात सोलर पंप बसवून घेतले आहेत. जे सोलर पंप इन्स्टॉल केले आहेत, त्याचबरोबर आणखी काही सोलर पॅनल बसवता येऊ शकतात का? असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 

मागेल त्याला सोलर पंप (Magel Tyala solar Pump) योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी आणि दहा एचपी अशा प्रकारची पंप वितरित करण्यात येत आहेत. अनेक शेतकरी या पंपांच्या प्रतिक्षेतही आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी पंप इन्स्टॉल केले आहेत, असे शेतकरी या सोलर पंपाचा लाभही घेत आहेत.

दरम्यान काही शेतकऱ्यांच्या मते जो सोलर पंप लावला आहे. या सोलर पंपाला एक्सट्रा पॅनल लावू शकतो का? किंवा त्याचा फायदा होईल का अशी विचारणा होत आहे. तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपल्याकडे जो सोलर पंप आहे, त्याला सोलर पॅनलची आवश्यकता आहे का? हे तपासण गरजेचे आहे.

शिवाय तुमच्याकडे जर तीन एचपीची मोटर असेल आणि सोलर प्लांट जर 3000 व्होल्टचा असेल तर असेल तर तुम्हाला एक्सट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण या व्होल्टेजमध्ये पूर्णतः काम करण्याची क्षमता असते. शेतकऱ्यांना एक्सट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता भासत असेल तर कंट्रोलरवरील माहिती पाहणं आवश्यक आहे. कंट्रोलरवरील इनपुट पावर क्षमता किती आहे? हेही तपासायला हवं. 

हे गणित समजून घ्या.. 

जर समजा व्होल्टेजची क्षमता 3000 पेक्षा अधिक असेल तर एक्सट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता या ठिकाणी राहील. अन्यथा 03 हजार आणि 03 हजाराच्या खाली जर समजा व्होल्टेज क्षमता असेल तर एक्सट्रा पॅनल लावण्याची आवश्यकता भासत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपणास दिलेल्या सोलर प्लांटची क्षमता ही योग्य असून त्यात एक्सट्रा पॅनल बसवून कंट्रोलर खराब होऊ शकतो. मोटर खराब होऊ शकते. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागू शकते.

Web Title: Latest News Solar Pump Yojana possible to install extra panels on solar plant see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.