Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Solar Pump Scheme : घरबसल्या करा सोलर योजनेसंदर्भात तक्रार, अशी आहे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

Solar Pump Scheme : घरबसल्या करा सोलर योजनेसंदर्भात तक्रार, अशी आहे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

Latest News Solar Pump yojana Now online portal to complain about solar pump scheme | Solar Pump Scheme : घरबसल्या करा सोलर योजनेसंदर्भात तक्रार, अशी आहे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

Solar Pump Scheme : घरबसल्या करा सोलर योजनेसंदर्भात तक्रार, अशी आहे तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

Solar Pump Scheme : योजनेचा लाभ घेताना किंवा देखभाल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक पाऊल उचलले आहे.

Solar Pump Scheme : योजनेचा लाभ घेताना किंवा देखभाल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक पाऊल उचलले आहे.

वर्धा :  'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेचा लाभ घेताना किंवा देखभाल करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी महावितरणने एक पाऊल उचलले आहे. शेतकऱ्यांना आता कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नसून, घरबसल्या एका क्लिकवर आपल्या तक्रारींचे निवारण करता येणार आहे.

सौर कृषी पंप बसवताना विलंब होत असेल किंवा सुरू असलेल्या पंपात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर आता थेट ऑनलाइन दाद मागता येईल. महावितरणने यासाठी विशेष 'तक्रार निवारण पोर्टल' सज्ज केला असून, तक्रारीचा मागोवा घेण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे.

तक्रार नोंदविण्याची सोपी प्रक्रिया
शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. त्यावरील होमपेजवर असलेलेल्या 'मागेल त्याला सौर कृषी पंप योजना' या टॅबवर करून तक्रार नोंदवता येईल.

तक्रार नोंदवताना आपला लाभार्थी क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक किंवा जिल्हा, तालुका, गाव आणि लाभार्थ्यांचे नाव टाकून शोधा व त्यानंतर आपली समस्या सविस्तर लिहा किंवा तक्रारीच्या स्थितीचा आढावा, देखील याच पोर्टलवर पाहू शकता.

लाभ घेण्याचे आवाहन
शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता, तांत्रिक अडचणींसाठी या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा आणि ज्यांनी अजून अर्ज केला नाही, त्यांनी त्वरित 'मागेल त्याला सौर कृषी पंप' योजनेचा लाभ घेऊन आपली शेती समृद्ध करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title : सोलर पंप योजना: घर बैठे ऑनलाइन शिकायत दर्ज करें, आसान प्रक्रिया

Web Summary : महावितरण ने सोलर पंप योजना की शिकायतों के लिए ऑनलाइन पोर्टल शुरू किया। किसान अब देरी या तकनीकी मुद्दों के बारे में www.mahadiscom.in के माध्यम से सीधे शिकायत दर्ज कर सकते हैं, जिससे कार्यालय जाने की आवश्यकता नहीं होगी। पोर्टल शिकायत की स्थिति को ट्रैक करने की अनुमति देता है, किसानों से योजना का लाभ उठाने का आग्रह किया गया है।

Web Title : File Solar Pump Scheme Complaints Online: Easy Registration Process

Web Summary : MahaVitaran introduces online portal for solar pump scheme complaints. Farmers can now register grievances regarding delays or technical issues directly through www.mahadiscom.in, avoiding office visits. The portal allows tracking of complaint status, urging farmers to utilize the scheme.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.