Solar Pump Scheme : महावितरणने फक्त एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषी पंप बसवून जागतिक विक्रम रचला आहे. याची अधिकृत नोंद उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिनीज बुकमध्ये होणार आहे. (Solar Pump Scheme)
दिवसा सिंचनाची अनेक दशकांची मागणी पूर्ण करणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.(Solar Pump Scheme)
महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी बजावत महावितरणने फक्त एका महिन्यात तब्बल ४५ हजार ९११ सौर कृषी पंप बसवण्याचा जागतिक विक्रम रचला आहे. (Solar Pump Scheme)
हा आश्चर्यकारक उच्चांक आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अधिकृतपणे नोंदवला जाणार आहे. या विक्रमाचा प्रमाणपत्र प्रदान सोहळा उद्या (शुक्रवारी) छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या दिमाखात होणार आहे.(Solar Pump Scheme)
गिनीज प्रमाणपत्र सोहळा
ऑरिक सिटी मैदानावर सकाळी १० वाजता होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, पालकमंत्री संजय शिरसाट, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, महावितरणचे एमडी लोकेश चंद्र या मान्यवरांची उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्र ऊर्जा क्षेत्रासाठी हा सोहळा एक अभिमानाची नोंद ठरणार आहे.
शेतकऱ्यांची दशके जुनी मागणी पूर्ण
सौर कृषी पंप बसविल्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा, त्यांच्या सोयीनुसार, हव्या त्या वेळेला सिंचन करता येते. वीजेवर अवलंबून न राहता सिंचनात स्वयंपूर्णता, वीज उपलब्धतेची खात्री, लोडशेडिंगची चिंता नाही यामुळे शेतकऱ्यांची दशकांपासूनची 'दिवसा वीज' ही अपेक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहे.
सौर पंपांमुळे मोठा आर्थिक फायदा
सौर पॅनेल्समधून २५ वर्षे सातत्याने वीज निर्मिती होते.
कृषी पंपांचे वीज बिल पूर्णपणे वाचतात
दीर्घकाळात लाखोंची बचत
पर्यावरणपूरक, हरित उर्जेचा वापर वाढतो
महाराष्ट्र सध्या देशातील सौर कृषी पंप बसवण्यात अव्वल राज्य ठरले आहे.
'मागेल त्याला सौर कृषी पंप'
राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेत शेतकऱ्यांना मोठे अनुदान मिळते
केंद्र सरकार : ३०%
राज्य सरकार : ६०%
शेतकरी हिस्सा : फक्त १०%
याशिवाय अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांनाही अनुदान मिळते.
अनुदान : ९५%
शेतकरी हिस्सा : फक्त ५%
यामुळे अत्यल्प खर्चात संपूर्ण सौर पंप संच उपलब्ध होतो.
सौर मोहिमेला वर्षभरात गती
महावितरणने मागील एक वर्षात सौर पंप बसवण्याच्या मोहिमेला मोठी गती दिली. केवळ एका महिन्यात जवळपास ४६ हजार पंप बसवून देशात आणि जगात महाराष्ट्राने नव्या इतिहासाची नोंद केली आहे. हा विक्रम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि ऊर्जा क्षेत्रासाठी मोठी अभिमानाची नोंद ठरणार आहे.
