Solar Panel Training : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील अमृत संस्थेच्या ललित लक्षित गटातील उमेदवारांसाठी मोफत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या निमित्ताने सूर्यमित्र प्रशिक्षण योजनेअंतर्गत सोलर पॅनल उभारणी (Solar Panel Training), देखभाल व दुरुस्ती प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षणाचे ठिकाण आणि कालावधी पहिले ठिकाण हे छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) असून या ठिकाणी प्रशिक्षणार्थी संख्या 40 आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या जिल्ह्यातील इच्छुक अर्ज करू शकतात. तर प्रशिक्षणाचे ठिकाण दुसरे लातूर असून या ठिकाणी देखील 40 प्रशिक्षणार्थी संख्या आहे. या ठिकाणी लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक सहभागी होऊ शकतील. प्रशिक्षण कालावधी 7 जानेवारी पासून ते 24 जानेवारी असा 18 दिवसांचा कालावधी आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2025 असून मुलाखतीची तारीख 2 जानेवारी 2025 आहे.
किमान पात्रता आणि कागदपत्रे या प्रशिक्षणासाठी किमान बारावी पास, पदवी व तांत्रिक शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ही 21 ते 50 वर्ष अशी असणार आहे. तर निवड ही संबंधित जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांच्या अर्जांना प्राधान्य देऊन निवड करण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जातीचा दाखल, उत्पन्नाचा दाखला, विवाहित असल्यास गॅझेट, विवाह प्रमाणपत्र, पॅन कार्डची प्रत इत्यादी.
इथे साधा संपर्क अधिक माहितीसाठी प्रवीण ठोके (मो. नं. ८८३०२२४९७९) आणि अमोल दिवेकर (मो. नं. ९५२७०७७५८६) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी https://www.mahaamrut.org.in/ या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज सादर करून एमसीडीच्या संबंधित जिल्हा कार्यालय द्वारा जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन येथे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह 1 जानेवारी 2025 रोजी पर्यंत अर्ज सादर करावा.
Insecticide Suit : आता फवारणी करतांना नो टेन्शन, आला भारताचा स्वदेशी कीटकनाशक सूट