Lokmat Agro >शेतशिवार > Solar Panel Damage : शेतकऱ्यांनो! सोलार पॅनल तुटलंय? अर्ज करा, मदत मिळवा वाचा सविस्तर

Solar Panel Damage : शेतकऱ्यांनो! सोलार पॅनल तुटलंय? अर्ज करा, मदत मिळवा वाचा सविस्तर

latest news Solar Panel Damage: Farmers! Solar panel broken? Apply, get help | Solar Panel Damage : शेतकऱ्यांनो! सोलार पॅनल तुटलंय? अर्ज करा, मदत मिळवा वाचा सविस्तर

Solar Panel Damage : शेतकऱ्यांनो! सोलार पॅनल तुटलंय? अर्ज करा, मदत मिळवा वाचा सविस्तर

Solar Panel Damage : मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवर बसवलेले सोलार पॅनल्स मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाइन किंवा महावितरणमार्फत अर्ज करावा. (Solar Panel Damage)

Solar Panel Damage : मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवर बसवलेले सोलार पॅनल्स मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाइन किंवा महावितरणमार्फत अर्ज करावा. (Solar Panel Damage)

शेअर :

Join us
Join usNext

Solar Panel Damage : राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांनी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पॅनल्स उलथून गेले. विशेषतः विहिरी व बोअरवेलवर बसवलेले सोलार पंपसेट मोठ्या प्रमाणात तुटले, वाकले किंवा उखडले गेले आहेत. (Solar Panel Damage)

परिणामी, शेतकऱ्यांना पुन्हा वीज किंवा पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, काळजीचं कारण नाही. शेतकऱ्यांना या नुकसानीबद्दल भरपाई मिळू शकते, फक्त योग्य ठिकाणी अर्ज करण्याची गरज आहे.(Solar Panel Damage)

मे महिन्याच्या वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवर बसवलेले सोलार पॅनल्स मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशा वेळी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थेट ऑनलाइन किंवा महावितरणमार्फत अर्ज करावा. (Solar Panel Damage)

शासनाच्या योजनेनुसार, पाच वर्षे मोफत देखभाल आणि दुरुस्तीची हमी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पॅनल तुटले तरी भरपाई किंवा दुरुस्ती शक्य आहे.(Solar Panel Damage)

सोलार पंपशक्तीमुळे शेतकऱ्यांनी वीज संकटावर मात केली असली, तरी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास योग्य प्रकारे आणि वेळी अर्ज केल्यास सरकारच्या योजनांमधून पूर्ण दुरुस्ती किंवा भरपाई मिळवता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.(Solar Panel Damage)

भरपाईसाठी अर्ज कोठे कराल?

सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी खालील दोन मार्गांनी अर्ज करता येतो.

ऑनलाइन अर्ज 

'कुसूम योजना' किंवा 'मागेल त्याला सौर कृषीपंप' संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संबंधीत कंपनीकडे देखभाल दुरुस्तीकरिता ऑनलाईन तक्रार करता येते.

ऑफलाइन अर्ज 

आपल्या स्थानीय महावितरण कार्यालयात अर्ज सादर करून पॅनल दुरुस्तीसाठी मागणी करता येते.

दुरुस्ती व मदत कोणाकडून मिळते?

शासनाच्या कुसूम किंवा 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेंतर्गत बसवलेले सोलार पंपसेट पाच वर्षे संबंधित कंपनीकडून देखभाल दुरुस्तीअंतर्गत येतात. त्यामुळे, कंपन्याच दुरुस्ती करतात. शेतकऱ्यांनी फक्त नुकसान झाल्याची माहिती व फोटोसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

महावितरण कंपनी फॉलोअप करून संबंधित कंपनीकडून सेवा मिळवून देते.

तालुकानिहाय सोलार पंपसेटची संख्या (हिंगोली जिल्हा)

तालुकासोलार पंपसेट संख्या
हिंगोली५१३
वसमत६९७
कळमनुरी१०७६
सेनगाव५८६
औंढा नाग.३४२

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती

* सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास विलंब न करता तत्काळ तक्रार नोंदवा

* पॅनलच्या स्थितीचे फोटो, पंप नंबर, युनिट नंबर यांसह तपशीलवार अर्ज सादर करा

* महावितरणची मदत न मिळाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा

सोलार पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी तातडीने संबंधीत संकेतस्थळ किंवा महावितरणकडे अर्ज करावा. अर्जाची शहानिशा करून दुरुस्ती किंवा बदलासाठीची कार्यवाही केली जाते. - सविता शिंदे, सहायक अभियंता

हे ही वाचा सविस्तर : Solar Energy : अकोल्यात सौरऊर्जेचा उजेड! सोलार प्रकल्प शेतकऱ्यांच्या सेवेत वाचा सविस्तर

Web Title: latest news Solar Panel Damage: Farmers! Solar panel broken? Apply, get help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.