Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, मंत्री बावनकुळे म्हणाले

शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, मंत्री बावनकुळे म्हणाले

Latest News shetkari Karjmafi 'these' farmers will not get loan waiver says minister bawankule read in detail | शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, मंत्री बावनकुळे म्हणाले

शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट, 'या' शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, मंत्री बावनकुळे म्हणाले

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. 

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीविषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. 

Shetkari Karjmafi :  शेतकरी कर्जमाफी विषयी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे. 

राज्य शासनाने २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत. अशा शेतकऱ्यांना देखील ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कर्जमाफीवर बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवीण परदेशी समिति कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया राबवणार आहे. यामध्ये दोन लाख रुपयांची कर्जमाफी कशी- कशी असणार आहे. राज्यातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, याकरिता एसओपी तयार होत आहे. 

ते पुढे म्हणाले, धन दांडग्या लोकांना म्हणजे ज्यांच्याकडे गाडी, बंगला आहे, फार्म हाऊस आहे, अशा लोकांना कर्जमाफी देऊन काय फायदा आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ज्या गरीब माणसाला कर्जमाफी दिली पाहिजे, अशा शेतकऱ्यांची SOP तयार करणे चालू आहे. या प्रक्रियेसाठी थोडा उशीर होईल, मात्र कमिटेड कर्जमाफी आम्ही करणार आहोत, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

कर्जमाफी कोणाची होणार ? 
दरम्यान या कर्जमाफीमध्ये कोण पात्र, कोण अपात्र होणार, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमता आहे. कारण कर्जमाफी विषयीचे निकष शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

हा अहवाल सादर केल्यानंतर कर्जमाफी कोणाची होणार आहे, हे निश्चित होणार आहे. मात्र आता ही कर्जमाफी किचकट प्रक्रियेच्या माध्यमातून राबवली जाईल, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सूतोवाच दिले आहे. 

 

 जर तुमच्या जमिनीची परस्पर विक्री झाली असेल, तर.. विक्रीपत्र रद्द कसं करायचं, वाचा संपूर्ण प्रक्रिया

 

Web Title : किसान ऋण माफी अपडेट: कुछ किसान अपात्र हो सकते हैं

Web Summary : राजस्व मंत्री ने स्पष्ट किया कि कार, बंगले और फार्महाउस वाले किसानों को ऋण माफी का लाभ नहीं मिल सकता है। सरकार छोटे और सीमांत किसानों को प्राथमिकता दे रही है, पात्रता के लिए एसओपी विकसित कर रही है। एक समिति की रिपोर्ट अंतिम लाभार्थियों का निर्धारण करेगी, जिससे जरूरतमंद किसानों को ऋण राहत सुनिश्चित होगी।

Web Title : Farmer Loan Waiver Update: Some Farmers May Not Be Eligible

Web Summary : Revenue Minister clarifies that farmers with cars, bungalows, and farmhouses may not benefit from the loan waiver. The government is prioritizing small and marginal farmers, developing SOP for eligibility. A committee report will determine final beneficiaries, ensuring committed debt relief for deserving farmers.