Seed QR Code : शेतकऱ्यांना खरी बियाण्यांची निवड करताना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बियाण्यांच्या प्रत्येक पाकिटावर क्युआर कोड (QR Code) अनिवार्य करण्यात येणार आहे, ज्यामध्ये वाणाची संपूर्ण माहिती समाविष्ट असेल. (Seed QR Code)
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत पारदर्शक माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्राने ही नवी व्यवस्था लागू केली असून, अंमलबजावणीसाठी १ नोव्हेंबर २०२५ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. (Seed QR Code)
खरीप हंगाम तोंडावर असताना बियाणे उत्पादक कंपन्यांना दिलासा देणारा आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा ठरणारा हा निर्णय मानला जात आहे. (QR Code)
शेतकऱ्यांना बियाण्यांची अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बियाण्यांच्या प्रत्येक पाकिटावर QR कोड (QR Code) बंधनकारक करण्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Seed QR Code)
खरीप हंगाम तोंडावर असताना ही प्रक्रिया अल्प वेळेत पूर्ण करणे कठीण असल्याचे कारण देत बियाणे उत्पादक कंपन्यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही मुदतवाढ जाहीर केली. (Seed QR Code)
काय आहे नवे नियम?
* प्रत्येक बियाण्याच्या पाकिटावर क्युआर कोड अनिवार्य असेल.
* या क्युआर कोडद्वारे शेतकऱ्यांना स्थानिक भाषांमध्ये वाणाची शिफारस, वैशिष्ट्ये आणि इतर आवश्यक माहिती मिळेल.
* १०० ग्रॅम किंवा त्याहून कमी वजनाच्या पॅकेटसाठी केवळ क्युआर कोड पुरेसा मानला जाईल.
* मोठ्या पॅकेटसाठी क्युआर कोडसह छापील माहितीपत्रक देणे आवश्यक राहील.
केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत की त्यांनी हे नवीन धोरण संबंधित बियाणे उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांपर्यंत पोहोचवून तात्काळ अंमलबजावणीसाठी कार्यवाही करावी.
अखिल भारतीय बियाणे उत्पादक संघटना तसेच इतर बियाणे कंपन्यांनी ही प्रक्रिया राबवण्यासाठी किमान सहा महिन्यांची मुदत मागितली होती. परंतु, केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपर्यंतचीच मुदत देत त्वरित तयारीचे निर्देश दिले आहेत.
नव्या प्रणालीचे फायदे
* शेतकऱ्यांना बियाण्याची खात्रीशीर माहिती तत्काळ मिळेल.
* बनावट वाण व चुकीच्या माहितीपासून शेतकरी वाचू शकतील.
* पारदर्शकता वाढून विश्वासार्ह व्यवहाराला चालना मिळेल.
बियाण्यांच्या क्युआर कोडद्वारे (QR Code) दिली जाणारी माहिती ही डिजिटल (Digital information) स्वरूपात मोबाईल स्कॅनद्वारे सहज उपलब्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च न करता सविस्तर माहिती मिळवता येणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर