Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पहा, वाचा सविस्तर

Agriculture News : खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पहा, वाचा सविस्तर

Latest News See what bhandara district farmers did to control the Khodkid of crops, read in detail | Agriculture News : खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पहा, वाचा सविस्तर

Agriculture News : खोडकिडीच्या बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पहा, वाचा सविस्तर

Agriculture News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे.

Agriculture News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- मोहन भोयर 
Agriculture News :
एकीकडे एआयवर आधारित शेती पुढे येत असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मागील काही दिवसांपासून धान पिकावर खोडकिड्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रमण केले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या बाम्हणी येथील शेतकऱ्यांनी मध्यरात्री गावातील मंदिरात मांत्रिकाकडून विशेष पूजन करवून घेतल्याचे समोर आले आहे. या पूजेत बाधा येऊ नये, यासाठी गावाचे दोन्ही रस्ते पूजाकर्म होईपर्यंत जवळपास तासभर बंद करून ठेवले. 

तुमसर या तालुका मुख्यालयापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर पूर्वेस असलेल्या गावात अंधश्रद्धेस खतपाणी घालणारा हा प्रकार घडला. या गावाची लोकसंख्या सुमारे १,७०० असून ४५० हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रमाणावर शेतकरी कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. खोडकिडीमुळे मोठ्या नुकसान होत असल्याने गावकऱ्यांनी फवारणी आणि कीडनाशकाचा वापर करण्याचा मार्ग सोडून, असा अघोरी प्रकार केला. 

या पूजेसाठी गावकऱ्यांनी सल्लामसलत करून सामूहिकरीत्या वर्गणी गोळा केली. बाहेरगावाहून मांत्रिकाला पाचारण केले. त्याला मानधन देऊन मंदिरात मध्यरात्री मंत्रोच्चारासह पूजन केले. या पूजेनंतर मांत्रिकाने, लवकरच कीड नष्ट होईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल, असे भाकीतही केल्याचे सुत्रांनी सांगीतले.

काही म्हणतात, ही परंपरा
काही गावकऱ्यांच्या मते ही परंपरा आहे. याप्रकरणी शहानिशा करण्यासाठी पोलिस पाटील आकाश कहालकर आणि सरपंच मानसी कहालकर यांच्याशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. परंतू गावातील एका तरूणाने या घटनेला दुजोरा दिला आहे.

प्रशासन अनभिज्ञ
गावात घडलेल्या या प्रकाराबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नाही. या घटनेची तालुकाभर चर्चा रंगली आहे. वैज्ञानिक जगात हा प्रकार विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे. तालुका स्तरावर तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी व इतर डझनभर कर्मचाऱ्यांच्या फौजफाटा आहे.

कर्मचारी शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करतात, असा दावा करण्यात येतो. यंत्रणेच्या कार्याची ऑनलाइन माहितीही राज्य सरकारच्या कृषी विभागाकडे नियमितपणे पाठवण्यात येते. तरीही खोडकिड्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मांत्रिकाचे दार गाठावे, हा प्रकार विचित्र ठरला आहे.

बाम्हणी येथील प्रकाराबद्दल आपणास माहिती नाही. धान किंवा अन्य पिकावर अळींच्या आक्रमणाबद्दल शेतकऱ्यांना कृषी कार्यालयाकडून नियमित माहिती दिली जाते. ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर माहितीची नोंद करण्यात येते. बाम्हणी येथील घडलेल्या प्रकाराला शास्त्रीय आधार नसून, हा अंधश्रद्धेचा भाग आहे. या गावाला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती जाणून घेऊ.
- दुर्गेश्वरी एकातपुरे, तालुका कृषी अधिकारी


 

Web Title: Latest News See what bhandara district farmers did to control the Khodkid of crops, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.