Join us

River Linking Project : मराठवाड्याला दुष्काळमुक्तीची नवी दिशा; ५४ TMC पाण्याचा प्रकल्प लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:32 IST

River Linking Project : मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारकडून मोठी झेप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी जाहीर केलेल्या ५४ टीएमसी पाण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा फुलल्या आहेत. (River Linking Project)

River Linking Project : मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारकडून मोठी पावले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.(River Linking Project)

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात बोलताना त्यांनी ५४ टीएमसी पाणीगोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी डिसेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पूर्ण होईल, तर जानेवारी २०२६ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू करून पुढील सहा महिन्यांत कामाला प्रारंभ केला जाईल, अशी घोषणा केली.(River Linking Project)

दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना

कृष्णा खोऱ्यातील पाणी आधीच मराठवाड्यात आणले आहे.

दुसऱ्या टप्प्यात सांगली-कोल्हापूरचे पाणी उजनीपर्यंत पोहोचवण्याचा आराखडा तयार आहे.

उल्हास खोऱ्यातील ५४ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याच्या प्रकल्पासाठी डिसेंबर २०२५ पर्यंत DPR तयार होईल.

जानेवारी २०२६ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू होऊन सहा महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होईल.

मुख्यमंत्री म्हणाले, गोदावरीचे खोरे हे तुटीचे खोरे आहे. त्या तुटीवर मात करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

शासनाच्या अलीकडील कामगिरीचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मागील दोन वर्षांत ७ प्रकल्पांतून ३८.४८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा वाढवण्यात आला.

घृष्णेश्वर मंदिर विकासासाठी ६१ कोटी, तुळजापूर आराखड्यासाठी ५४१ कोटींची तरतूद.

मानव विकास मिशनअंतर्गत ९४ बसेस, मनपाला ११५ बसेस वितरित.

९ महामार्गांसाठी वर्कऑर्डर; ९१६ अंगणवाड्या सुरू.

४ लाख सिंचन विहिरींपैकी ३० हजार पूर्ण, १ लाख १४ विहिरींची कामे सुरू.

२७४० कोटींची पाणीपुरवठा योजना, ८२२ कोटी मनपाला मंजूर.

कृषी आणि शेतकरी प्रश्न

यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा जादा पाऊस पडला; तरीही खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले.

८ हजार ५५० गावांपैकी सुमारे ४ हजार २५१ गावांतील १६.८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान.

ओल्या दुष्काळामुळे ३ महिन्यांत २७०, तर ८ महिन्यांत ७०७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे अधिकृत आकडे.

सर्वाधिक १७२ आत्महत्या बीड जिल्ह्यात.

अतिवृष्टीत जीव गमावलेल्या व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाणार असल्याची घोषणा.

मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी ५४ टीएमसी पाण्याचा प्रकल्प हा या प्रदेशासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार यावर सरकार काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्यांवर वेळेत मदत मिळावी, हेच आता सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरणार आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आहे. यात आपले अनेक बांधव दगावले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वांना राज्य सरकार मदत देईल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

हे ही वाचा सविस्तर : River Linking Project : नदीजोड प्रकल्प व्यवहार्य; मराठवाड्याला मिळणार 'इतके' टीएमसी पाणी

टॅग्स :शेती क्षेत्रनदीमराठवाडाधरणपाणीगोदावरी