Agriculture News : गोंदिया जिल्ह्यात तालुकास्तरावर पणन हंगाम २०२५-२६ अंतर्गत प्राप्त सी.एम. आर. साठवणूकीकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे व खाजगी गोदामे किमान १५०० में. टन क्षमता असलेले व सोयीयुक्त गोदामांची आवश्यकता आहे.
सदर गोदामांचे प्रस्ताव दि. १६ डिसेंबरपासून दि. २५ डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील पुरवठा शाखा (खोली क्रमांक-००३, तळमजला) येथे कागदपत्रासह सादर करावी.
गोदामासाठीचे निकष
1. मजबूत रचना.
2. वर्षभर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्याचे अनुषंगाने गोदामातील आतंरीक व बाह्य रस्ते पक्के सिमेंटीकरण केलेले असावे जेणेकरुन पावसाळयात चिखल होवून ट्रक फसणार नाहीत.
3. गोदामाचा मजला आणि भिंती सिमेंट, काँक्रीट विटाने बनलेले असले पाहिजे व गोदामात ओलावा नसावा.
4. गोदामाची छप्पर गळती नसावी.
5. गोदामात सुलभ दोन व्दार सुविधा उपलब्ध असावी.
6. गोदाम dumping ground पासून दूर असावे.
7. गोदाम कारखान्यांपासून दूर असावे.
8. गोदामात विद्युत पुरवठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व शौचालय असावी.
9. गोदामाच्या प्रवेश द्वार, मालाची आवक, जावक इ. ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था असावी.
10. गोदामात साठवणूकीत असलेल्या सीएमआरच्या सुरक्षीततेबाबतची जबाबदारी गोदाम मालकाची राहील. जसे दिवसा व रात्रीकरिता पाहारेकरी इत्यादी.
11. गोदामातील एका शेडला (shed) कमीत कमी दोन गेट असावेत.
12. गोदामाच्या आवारात स्वमालकीने वजन काट्याची व्यवस्था असावी.
13. जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत नियुक्ती गोदाम व्यवस्थापक, गुणवत्ता नियंत्रक, उचल प्रतिनिधी, वाहतूक कंत्राटदार यांना कार्यालयीन काम सुरळीतपणे करता येईल. या अनुषंगाने त्यांचकरिता स्वतंत्र व्यवस्था असावी. जसे- टेबल, खुर्ची, पंखा, संगणक, प्रिड़.
14. अग्नी शामक यंत्र असावी.
15. किमान 10 गाडया गोदामात उभ्या असण्याकरीता पार्किंग सुविधा असावी.
16. गोदामाचे बांधकाम हे जमीन स्तरापेक्षा उंच असावे व सुरक्षाभिंत असावी. जेणेकरुन धानाची चोरी व प्राण्यापासून नुकसान होणार नाही.
प्रथम आवश्यक कागदपत्रे :
- 1. इमारत बांधकाम केलेल्या जागेचे मालकी हक्काचे दस्तावेज.
- 2. गोदामाची साठवण क्षमता (मे.टन मध्ये) गोदाम क्षमता किमान १५०० मे.टन आवश्यक व त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे क्षमतेबाबत प्रमाणपत्र.
- 3. इमारतीचा सविस्तर नकाशा (आर्किटेक्ट द्वारे काढलेला), इमारतीचा नकाशा, इमारत बांधकाम वर्ष नमूद करुन, परवानगीनुसार बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रासह स्थानिक नगरपरिषद / ग्रामपंचायत मुख्याधिकारी / सचिव यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
- 4. चालू वर्षाचे दुष्यम निबंधक यांचे बांधकाम व खुल्या जागेचे 'प्रभावी मुल्यांकन' दरपत्रक.
- 5. नगरपरिषद्/ग्रामपंचायतचे कर भरणा पावती (मागील व चालू वर्षाचे)
- 6. गोदामातील साठ्याचा विमा, किडप्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षा इ. बाबतची प्रमाणपत्र
- 7. FASSI यांचे धान्य साठवणुकीचे परवाना.
- 8. धुरीकरण (Fumigation) केल्याचे प्रमाणपत्र.
