Harbhara Nondni : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत १ मार्च २०२६ पासून हरभरा खरेदीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यात १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत हरभरा हमीभाव खरेदी साठी ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी कशी करायची , हे समजून घेऊयात...
हरभरा हमीभाव खरेदी नोंदणी २०२६ अंतर्गत शेतकऱ्यांना नोंदणीसाठी आधारकार्ड, ई पीक पाहणी सातबारा उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे.
हमीभाव खरेदी नोंदणी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असून ऑनलाइन पोर्टलद्वारे तसेच 'eSamriddhi' मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही घरबसल्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचबरोबर शेतकरी सध्या सुरु असलेल्या तूर हमीभाव खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष भेटून ही नोंदणी करू शकतात.
'eSamriddhi' (ई-समृद्धी) ॲपद्वारे हरभरा खरेदी नोंदणी
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरून 'eSamriddhi' (ई-समृद्धी) ॲप डाऊनलोड करा.
- लॉगिन/नोंदणी : ॲप उघडून शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे पडताळणी कर.
- माहिती भरणे : वैयक्तिक माहिती, जसे की नाव, पत्ता, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
- पीक तपशील : हरभरा पिकाची निवड करा, आणि सातबाऱ्यावरील गट क्रमांक, पेरणी केलेले क्षेत्र (हेक्टर/एकर) भरून माहिती सेव्ह करा.
- कागदपत्रे अपलोड : आधार कार्ड, सातबारा उतारा, आणि बँकेचे पासबुक अपलोड कर.
- नोंदणी पूर्ण : माहितीची खात्री करून सबमिट करा. नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक टोकन क्रमांक मिळेल, जो खरेदी केंद्रावर उपयोगी पडेल.
तुमच्या नावावर एवढी जमीन असल्यास रेशन होणार बंद, उत्पन्नाचीही मर्यादा, काय आहे नवीन मोहीम
