Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

Latest News Rare 'Sonsavar' of medicinal properties found in Katepurna near washim | काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

काटेपूर्णात आढळली औषधी गुणयुक्त दूर्मिळ 'सोनसावर', अशी आहेत वैशिष्ट्ये 

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला सोनसावर वृक्ष वनोजातील वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे.

काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला सोनसावर वृक्ष वनोजातील वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे.

वाशिम : अकोला-वाशिम जिल्ह्यात पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यात अनेक दूर्मिळ वनस्पतींचा खजिना आहे. तथापि, त्याबाबत अनेकांना माहिती नाही. या अभयारण्यातील असाच एक दूर्मिळ आणि औषधी गुणांनी युक्त असलेला वृक्ष वनोजातील आदित्य इंगोले, शूभम हेकड, प्रविण गावंडे, सौरव इंगोले या वन्यजीवप्रेमींनी शोधला आहे. 'सोनसावर', असे या दूर्मिळ वृक्षाचे नाव आहे.

वनोजा परिसरात यापूर्वी दूर्मिळ पिवळा पळसही आढळला असून, तोसुद्धा आदित्य इंगोले, शूभम हेकड, प्रविण गावंडे, सौरव इंगोले यांनाच प्रथम आढळून आला होता. आता काटेपूर्णा अभयारण्यात त्यांनी दूर्मिळ 'सोनसावर' हा वृक्ष शोधून काढला आहे. सोनसावर या वृक्षाला मराठीत गणेर (येलो सिल्क कॉटन ट्री), असे म्हणतात. हा मध्यम आकाराचा असून, पानझडी या प्रकारामध्ये मोडतो. हा वृक्ष भारतात मर्यादित भागातच आढळतो. जानेवारी महिन्यात या वृक्षाची पानगळ होऊन फेब्रुवारी महिन्यात याला मोठी सोनेरी पिवळ्या रंगांची फुले येतात. 

हा वृक्ष फक्त डोंगरावर वाढणारा असून त्याची रोपे तयार करायची असल्यास ते सहजासहजी तयार होत नाहीत. याची फळे ही वांग्याच्या आकाराची असून व जांभळ्या रंगाची असतात. फळे पक्व झाल्यावर फळांना करडा रंग प्राप्त होतो. या फळांमध्ये असलेली रुई खुप मुलायम व क्रीम रंगाची असते. साध्या व काटेसावर वृक्षापेक्षाही या वृक्षाच्या फळातील रुई अधिक मुलायम असते. काटेपूर्णातील निष्पर्ण सागवान वृक्षाच्या जंगलात आढळलेल्या या वृक्षाची पिवळी सोनेरी फुले अक्षरशः नयनतृप्त करतात. या वृक्षाची वाशिम जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच नोंद असावी. या सोनसावर वृक्षाच्या संवर्धनाचा मानस वनोजातील वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

इंग्रजीमध्ये टॉर्च ट्री नावाने ओळख
सोनसावर वृक्षाला इंग्रजीत टॉर्च ट्री नावानेही ओळखले जाते. या वृक्षाची सुकलेली लाकडे खूप वेळ जळतच राहतात. या वृक्षाच्या फांद्यामध्ये विशिष्ठ प्रकारचे तेल असते म्हणून याचा वापर रात्रीची जंगलात भटकंती करताना मशाली म्हणून पूर्वीच्या काळी केल्या जात असे. त्यामुळेच या वृक्षाला इंग्रजीत टॉर्च ट्री हे नाव पडले असावे.

अनेक औषधी गुणांचा समावेश

सोनसावर वृक्षापासून औषधी डींक मिळतो. या डिंकाला कथल्या गोंद असे म्हणतात. या वृक्षाची साल व पाने देखील औषधी गुणधर्मयुक्त अशी आहेत. यांच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे यापासून दोरखंड तयार करतात.

वनविभागाच्या सहकार्याने संवर्धनाचा मानस++

Web Title: Latest News Rare 'Sonsavar' of medicinal properties found in Katepurna near washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.