Lokmat Agro >शेतशिवार > एक रानभाजी, अनेक आरोग्यदायी फायदे, कर्टूल्याच्या भाजीची रेसिपी समजून घ्या!

एक रानभाजी, अनेक आरोग्यदायी फायदे, कर्टूल्याच्या भाजीची रेसिपी समजून घ्या!

Latest News ranbhajya many health benefits of kartola ranhbaji see full recipe of kartule ranbhaji | एक रानभाजी, अनेक आरोग्यदायी फायदे, कर्टूल्याच्या भाजीची रेसिपी समजून घ्या!

एक रानभाजी, अनेक आरोग्यदायी फायदे, कर्टूल्याच्या भाजीची रेसिपी समजून घ्या!

Kartule Ranbhaji : कर्टूल्याच्या (Kartule) फळांची भाजी कारल्यासारखीच असून, विविध आरोग्यदायी फायदे आहेत.

Kartule Ranbhaji : कर्टूल्याच्या (Kartule) फळांची भाजी कारल्यासारखीच असून, विविध आरोग्यदायी फायदे आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

Kartule Ranbhaji : कर्टूल्याच्या (Kartule) फळांची भाजी कारल्यासारखीच असून, पावसाळ्याच्या अखेरीस ही भाजी (Ranbhaji) बाजारात काही ठिकाणी येते. ही भाजी रुचकर असून, पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते. (

त्याचबरोबर लघवीतील शर्कराही नियंत्रित होते. ज्यांच्या मूळव्याधीतून वरचेवर रक्तस्राव होतो; वेदना, ठणका असतो, अशांसाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे. सर्दी, खोकला, ताप या पावसाळ्यातील विकारांवर करटोलीची भाजी (Ranbhajya) हितावह आहे. करटुल्याची भाजी कशी बनवायची, हे पाहुयात...                            

साहित्य-                               

  • हिरवी कोवळी करटोली 
  • आले खोबरे अर्धी वाटी 
  • बारीक चिरलेला कांदा एक वाटी 
  • हिंग, मोहरी, मीठ, जिरे, हळद
  • दोन चिरलेल्या मिरच्या
  • लाल तिखट, साखर, तेल इत्यादी.

कृती -

  1. करटोल्यांचे अर्धे भाग करुन त्यातील बिया व गर काढून टाकावा. 
  2. नंतर बटाट्याचे काप केल्याप्रमाणे करटोली चिरुन घ्यावीत.
  3. पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी व थोडेसे जिरे टाकून फोडणी घालावी.
  4. त्यात चिरुन घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
  5. नंतर त्यात कांदा, मीठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालुन चांगले परतावे.
  6. चिरलेली करटोली त्यात घालुन पुन्हा परतून घ्यावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी.
  7. नंतर झाकण काढून मंद गॅसवर पाणी न घालता ३ ते ४ मिनिटे भाजी परतावी व नंतर वरुन ओले
  8. खोबरे व थोडी साखर घालावी.                  

 

- - श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, ता. येवला, जिल्हा- नाशिक

Bharangi Ranbhaji : पोटाच्या विकारावर उपयुक्त असलेली भारंगी रानभाजी, अशी आहे रेसिपी

Web Title: Latest News ranbhajya many health benefits of kartola ranhbaji see full recipe of kartule ranbhaji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.