Bamboo Komb Bhaji : पावसाळ्याच्या सुरुवातीस बांबूच्या बेटांमध्ये (Vaste Bhaji) नवीन कोवळे कोंब उगवतात. साधारणतः फूटभर उंचीपर्यंतचे कोंबच भाजीसाठी (Bamboo Komb Bhaji) उपयुक्त असतात. हे कोवळे टोकदार सालींनी झाकलेले असतात. मुळाशी कापून त्यांचा उपयोग होतो. सोलून आतला पांढरट गर फोडी करून किंवा किसून भाजीसाठी वापरतात.
भाजी बनवण्याचे प्रकार
कोवळ्या गराची उसळसारखी पातळ भाजी
किसलेल्या गराची कोरडी भाजी
लोणचं, मुरंबा, सुपारी, कँडी इत्यादी रूपांतर
बांबूची कोंब रस्सा भाजी – पारंपरिक पाककृती
साहित्य :
- ५ जुड्या बांबू कोंब (चिरून)
- १/२ नारळ (ओलं खोबरं, किसून)
- ४ कांदे (चिरून)
- १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद
- ५ लवंगा, मिरी, १ इंच दालचिनी
- २ चमचे धणे, १ चमचा बडीशेप
- २ पळी तेल, मीठ, गूळ, १ चमचा कोकम आगळ
कृती :
- चिरलेली भाजी पाण्यातून नीट धुऊन घ्या
- एका पातेल्यात तेल गरम करून, त्यात कांदा, लसूण, खडा मसाला व खोबरं परतून घ्या
- सर्व साहित्य वाटून बारीक वाटण तयार करा
- दुसऱ्या भांड्यात कांदा व भाजी थोड्या पाण्यात शिजवून घ्या
- शिजल्यावर तयार वाटण, मीठ, गूळ व आगळ टाकून उकळी आणा
- वरून कोथिंबीर घालून भात किंवा भाकरीसोबत गरमागरम वाढा
- बांबूच्या कोंबांची ही भाजी वर्षातून फक्त एकदाच मिळते – म्हणून ही निसर्गदत्त देणगी अवश्य अनुभवावी!
बांबू कोंबांची उपलब्धता
- वर्षातून फक्त पावसाळ्याच्या सुरुवातीस १५ दिवस भाजीसाठी उपयुक्त
- निसर्गाची एक मौल्यवान भेट
- नैसर्गिकरित्या वाढलेली, रासायनिक खताशिवाय
बांबूचे पोषणमूल्य
- प्रथिने, कर्बोदके, फायबर्स, अमिनो ॲसिड्स
- कॅलरीज कमी (१०० ग्रॅममध्ये केवळ २७ कॅलरीज)
- वजन नियंत्रणासाठी उपयुक्त
- बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे: नियासिन, थायामिन, रिबोफ्लेविन, पॅन्टोथेनिक अॅसिड
प्रादेशिक उपयोग (मणिपूर व ईशान्य भारत)
- बांबूचे कोंब आंबवून व ताजे दोन्ही स्वरूपात वापरले जातात
- Bambusa nutans, Dendrocalamus giganteus, D. hamiltonii या प्रजाती पोषणमूल्याने समृद्ध
- ताज्या, आंबवलेल्या व व्यावसायिक प्रक्रिया केलेल्या स्वरूपात वापरले जातात
बांबू वनस्पतीची शास्त्रीय ओळख
- झाड : उंच, सरळसोट, बहुवर्षायू व समूहाने वाढणारे
- खोड : २०-३० मीटर उंच, पोकळ पेरे असलेले
- पाने : १७-२० से.मी. लांब, भाल्यासारखी, खरबरीत
- फुले : लहान, एकलिंगी, पाकळ्यांशिवाय
- फळ : लहान, फुगीर व टोकदार, फळधारणेनंतर झाड मरते
- बीज : “वेणुज” म्हणून ओळखले जाते
- नर व मादी फुले वेगवेगळ्या वृक्षांवर येतात.
बांबूमधील औषधी गुणधर्म
औषधी उपयोग माहिती
- गर्भाशय संकोचन कोवळ्या कोंबांचा काढा बाळंतपणात उपयोगी
- अतिसार गुरांना पाने + मिरी + मीठ
- पाचनवर्धक लोणचं, कढी उपयुक्त
- सांधेदुखी कोवळे कोंब कुटून बांधतात
- कफस्राव कोवळी पाने + दालचिनी वाटून देतात
- बद्धकोष्ठता दोन्ही प्रकारचे फायबर्स
- चयापचय सुधारणे बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वे मुबलक
- श्रीमती सोनाली कदम, सहाय्यक कृषि अधिकारी, आडगाव चोथवा, तालुका-येवला, जिल्हा-नाशिक
Jwarichi Bhakari : ज्वारीच्या भाकरीने वजन कमी होतं का, आणखी काय फायदे आहेत?