Join us

Ran Keli : रानकेळीचे 'हे' फायदे माहित आहेत का? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 19:43 IST

Ran Keli : रानकेळी उपयुक्त असून या केळीला जंगली केळी किंवा रानकेळी (Ran Keli), तसेच ग्रामीण भाषेत कवदर देखील म्हटले जाते.

Ran Keli :  महाराष्ट्रात केळी पिकाची (Banana Crop) मोठ्या प्रमाणात केली जाते. शिवाय आहारात देखील केळीचा वापर होतो. मात्र रानकेळी बद्दल माहिती आहे का? हि केळी देखील अत्यंत उपयुक्त असून या केळीला जंगली केळी किंवा रानकेळी (Ran Keli), तसेच ग्रामीण भाषेत कवदर देखील म्हटले जाते. या केळीचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे. तर जाणून घेऊयात रानकेळी बद्दल... 

रानकेळी म्हणजे केळीपेक्षा कमी आकाराची पण, केळी सारखीच दिसणारी झाडे. डोंगराळ आणि दुर्गम भागात ही झाडे आढळतात. आदिवासी भागातील लोक याला 'कवदर' असे म्हणतात. श्रावण महिन्यात (Shravan Month) पूजेसाठी नागवेली आणि केळीच्या पानांना विशेष मागणी असते. या काळात रानकेळीच्या पानांच्या किमती वधारलेल्या असतात. साधारण ३० रुपयापासून ते ४० रुपयांपर्यंत भाव असतो. 

डोंगराळ तसेच दुर्गम भागामध्ये केळी पेक्षा कमी आकाराचीच पण, केळी सारखीच दिसणारी झाडे आपल्याला दिसतात, त्यांना रानकेळी म्हणतात. आदिवासी भागातील लोक 'कवदर' असे म्हणतात. या रानकेळी हया जंगलामध्ये अडचणीच्या ठिकाणी उगवलेल्या असतात. तसेच खडकाच्या कपारीत, दरीमध्ये अशा ठिकाणी उगवतात. दक्षिण भारतात मिळणाऱ्या आणि जळगाव जिल्ह्यात मिळणाऱ्या केळ्यांची चव यात फरक दिसून येतो. 

फायदे काय आहेत? 

या केळीच्या पानांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. तसेच या केळीपासून भाजी देखील बनवली जाते. कारण केळांची साईज बारीक असते. रानभाजी म्हणून तिचा उपयोग होत असतो. शिवाय काही भागात बटाटा घालून कटलेट बनवले जातात. विशेष म्हणजे ही केळी जेव्हा पिकते, तेव्हा यात गर खूप कमी असतो, मात्र यातील बियांची आयुर्वेदिक पावडर बनवली जाते. ती काही आजारांवर वापरली जाते. 

 

 पीक व्यवस्थापनापासून, शेतीच्या सर्व अपडेटसाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा...

 

टॅग्स :केळीशेती क्षेत्रमार्केट यार्डजळगावआरोग्य