Healthy Radish : हिवाळ्यात सहज मिळणारा मुळा हा खरेतर 'सुपर फूड' मानला जातो. कमी कॅलरी आणि भरपूर पोषणमूल्यांमुळे तो थंडीच्या दिवसांत शरीरासाठी अमृतासारखा लाभदायी ठरतो.
सलाड, पराठा, भाजी किंवा लोणचे अशा कोणत्याही रूपात तो सहज खाता येतो. मुळ्यात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजांचे प्रमाण जास्त असल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- खोकला थंडीपासून बचाव होतो. त्यातील फायबर पचनसंस्था सक्षम ठेवते.
- बद्धकोष्ठता असेल तर तो अत्यंत उपयुक्त ठरतो.
- पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारते.
- तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हाडे व स्नायू मजबूत करतात.
- फोलेट आणि व्हिटॅमिन बी-६ मुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि मेटाबॉलिझम सुरळीत राहतो.
- मुळ्यात भरपूर पाणी असते. त्यामुळे शरीर हायड्रेट होते.
- तसेच विषारी घटक बाहेर पडण्यास मदत मिळते. त्यातून लिव्हर आणि किडनी निरोगी राहतात.
तथापि, आयुर्वेदानुसार मुळा काही विशिष्ट पदार्थांबरोबर खाल्ल्यास 'विरुद्ध आहार' तयार होतो आणि पचनास हानी पोहोचवू शकतो. अशा चुकीच्या संयोजनांमुळे गॅस, अॅलर्जी, त्वचेच्या तक्रारी आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे मुळा अत्यंत फायदेशीर असला तरी काही पदार्थांबरोबर तो टाळणे आवश्यक आहे.
या पदार्थांसोबत मुळा खाणे टाळा?
दूध, दही, पनीर, ताक, मांस, मासे, केळी, संत्रा, सफरचंद, गूळ तसेच साखरेसोबत मुळा खाऊ नये. अन्यथा गॅस, पोटदुखी, आम्ल, कफ अशा समस्या उद्भवतात. तसेच रात्रीच्या वेळी मुळा खाणे टाळावे.
